थिवी येथून अपहरण केलेल्या नवीन पटेलची अवघ्या 24 तासांत सुटका

कोलवाळ पोलिसांची कामगिरी; अपहरण‌‌ करणाऱ्या चार जणांना अटक; बुधवारी केलं होतं अपहरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः माडेल थिवी येथून एक कोटी खंडणीसाठी नवीन पटेल (35) या व्यवसायिकाचं पिस्तूलाचा धाक दाखवून अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी अवघ्या काही तासांत पटेल यांची गोवा वेल्हा येथून सुटका करून पाचही अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. अटक केलेले पाचही संशयित कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहार अशा राज्यांतील आहेत.

हेही वाचाः डान्सिंग अंकललाही लाजवेल असा ‘डान्सिंग मुंबई पोलीस’

बुधवारी दुपारी घडली घटना

ही अपहरणाची घटना बुधवारी दुपारी 12 वा. घडली. तर रात्री 9.30 वा. 1 कोटी रुपयांची खंडणीच्या मागणी केल्यानंतर हा अपहरण नाट्याचा प्रकार उघडकीस आला. प्राप्त माहितीनुसार अपरहणकर्ता नवीन पटेल आणि त्यांच्या भावाचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. या पटेल बंधूकडे बंगुळूर कर्नाटकमधील संशयिताचा भाऊ कामाला होता. लॉकडाऊनवेळी तो काम सोडून गेला होता. दोन्ही पटेल बंधूकडे काही महिने त्याने काम केलं होतं. या बंधूंकडे अफाट पैसा असल्याचं त्याने आपल्या संशयित भावाला सांगितलं होतं. त्यानुसार त्या बंगळूर कर्नाटक मधील संशयिताने नवीन पटेल याचं अपहरण करणं आणि त्याच्या भावाकडून खंडीणीची रक्कम वसूल करण्याचा बेत आखला होता. त्यासाठी त्याने आपल्या गोवा, महाराष्ट्र आणि बिहारमधील साथीदारांना सहभागी करून घेतलं.

हेही वाचाः Tokyo Olympic 2021 |अभिमानास्पद! कुस्तीपटू रवीकुमार दहियाला रौप्य पदक

पिस्तुलाचा धाक दाखवत केलं अपहरण

बुधवारी दुपारी 12 वा. नवीन पटेल हा आपल्या माडेल थिवी येथील दुकानावर होता. त्यावेळी क्रेटा या आलीशान कारने संशयित त्याच्या दुकानावर आले आणि त्यांनी त्याला पिस्तूलचा धाक दाखवून गाडीत बसवलं. गोवा वेल्हा येथे एका बंद घरात नेऊन त्याला कोंडून ठेवलं. रात्री संशयितांनी नवीन पटेल याच्या भावाला फोन केला आणि तुमच्या भावाचं अपहरण केलं असून तो सहीसलामत हवा असल्यास 1 कोटी रूपये खंडणी द्या, खंडणीची रक्कम न दिल्यास नवीन पटेलला ठार मारू अशी धमकी दिली. या प्रकाराने भांबावलेल्या पटेल कुटुंबियांनी रात्री 9.30 वा. कोलवाळ पोलिस स्थानकात धाव घेत अपहरणाची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने चौकशी करून मध्यरात्री 1 च्या सुमारास संशयितापैकी एकाला पकडलं.

हेही वाचाः संतापजनक! हॉकी टीम पराभूत झाल्यानंतर खेळाडूच्या घराजवळ फोडले फटाके

गुरुवारी सकाळी केली नवीन पटेलची सुटका

नवीन पटेल याला गोवा वेल्हा येथे एका बंद घरात कोंडून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कोलवाळ पोलिसांनी आगशी पोलिसांच्या मदतीने गुरूवारी सकाळी 9.30 च्या सुमारास सदर घरावर छापा मारला आणि पटेल यांची सुटका केली. सर्व अपहरण कर्त्यांना गजाआड केलं. तसंच अपहरणासाठी वापरण्यात आलेली कारही जप्त केली.

हेही वाचाः HDFC ची वादग्रस्त जाहिरात, सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग

पोलिस अधीक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ पोलिस निरीक्षक विजय चोडणखर आणि बार्देश आणि तिसवाडी पोलिसांनी ही कारवाई केली.

हा व्हिडिओ पहाः Video | MAJOR PORT LAW | हा कायदा गोव्याचं अस्तित्व संपवणारा- कॉंग्रेस

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!