निसर्गाला जपलं तरच निसर्ग आम्हाला जपेल

अश्विनी पालयेकर: वटपौर्णिमेनिमित्त केलं दीड हजार रोपट्यांचं वितरण

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः झाडांचं महत्व अनादी काळापासून सर्वजण जाणतात. झाडांचं आणि सजीव जीवनाचं अतूट नातं आहे. निसर्गाला आम्ही जपलं तरच निसर्ग आम्हाला जपेल, असं प्रतिपादन पेडणे नगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनी पालयेकर यांनी केलं.

हेही वाचाः आता सुपरस्पेशालिटी, दक्षिण जिल्हा हॉस्पिटलातच होणार कोविडवर उपचार

वटपौर्णिमेनिमित्त दीड हजार झाडांचं वितरण

वटपौर्णिमेचं औचित्य साधून पेडणे नगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनी पालयेकर आणि गोवा जैवविविधता खाते यांच्यातर्फे प्रभाग दोनमध्ये विविध प्रकारच्या दीड हजार रोपट्यांचं प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन वितरण करून त्यांच्या संगोपनाची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा घट

ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम

यावेळी संतोष किनळेकर, उत्तम किनळेकर, प्रतिकेश अमेरकर, साईश किनळेकर,सुशांत अमेरकर, लक्ष्मण तुळसकर, सीमा किनळेकर, उमा किनळेकर, सीमा संतोष किनळेकर, अतिथी किनळेकर, यश पालयेकर, पूनम पालयेकर, त्रिंबक किनळेकर, मनीषा पालयेकर, पवन आंबेकर, यश किनळेकर, शिवम अमेरकर, सुनंदा पेडणेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचाः पैसे उकळल्या प्रकरणी चार पोलिस निलंबित

‘झाडे लावा, झाडे जगवा’

निसर्ग, पक्षी, प्राणी किती तादात्म्य साधून आहेत, फक्त माणूस निसर्गापासून तुटत चालला आहे. त्यामुळे आजच निर्धार करूया आणि एकसाथ पुन्हा ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया. आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ही झाडं वितरित करत आहोत आणि त्यांना झाडं लावण्यासाठी प्रेरित करत आहोत. जेणेकरून निसर्गाचा समतोल राखला जाईल आणइ भविष्यात सर्वत्र हिरवाई पसरलेली आम्हाला दिसेल, असं पालयेकर म्हणाल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!