गोवा विद्यापीठात मराठी विभागातर्फे राष्ट्रीय वेबिनार

प्रसिद्ध समीक्षक प्रा. अविनाश सप्रे या वेबिनारचं बीजभाषण करणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा विद्यापीठ, मराठी विभागातर्फे दि. ५ फेब्रुवारीला सकाळी १०:३० ते दुपारी २ या वेळेत ‘मराठी कादंबरीचे बदलते स्वरूप’ या विषयावर एका राष्ट्रीय वेबिनारचं आयोजन करण्यात आलंय. प्रसिद्ध समीक्षक प्रा. अविनाश सप्रे या वेबिनारचं बीजभाषण करणार आहेत. शिवाजी विद्यापीठ, मराठी विभागाचे विभाग प्रमुख व नव्या पिढीतील प्रथितयश समीक्षक डॉ. रणधीर शिंदे व प्रसिद्ध कादंबरी लेखक मा. प्रवीण बांदेकर हे या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

कादंबरी हा लोकप्रिय साहित्य प्रकार

कादंबरी हा सध्या सर्वात लोकप्रिय असा साहित्य प्रकार असून, मानवी जीवनाचा समग्र आढावा घेणारा साहित्यप्रकार म्हणून कादंबरीकडे पाहिले जाते. मराठी कादंबरी लेखनाला ह.ना. आपटेंपासून, वि.स. खांडेकर ते भालचंद्र नेमाडे अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. कालानुरूप कादंबरी लेखनात आशय आणि आविष्कार या दोन्ही संदर्भात अनेक परिवर्तनं झालीत. नव्वदोत्तर काळात यामध्ये काही वैविध्यपूर्ण परिवर्तने झाल्याचं पहायला मिळतं. या सर्वाचा आढावा या वेबिनारमध्ये घेतला जाणार आहे.

प्रा. विनायक बापट हे या परिसंवादाचे संयोजक असून या परिसंवादात सहभागी होण्यासंबंधी काही विचारणा करायची असल्यास ९४२३८३४५८५ किंवा ९७६४९७१२५६ या क्रमांकावर त्यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.