प्रसाद शेट काणकोणकर, सिध्दार्थ कांबळे, नारायण पिसुर्लेकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

राष्ट्रीय पत्रकारिता दिवस 16 नोव्हेंबर रोजी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : गोवन वार्ताचे वरिष्ठ प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे, प्रतिनिधी प्रसाद शेट काणकोणकर आणि छायापत्रकार नारायण पिसुर्लेकर यांना माहिती आणि प्रसिद्धी खात्याचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारतातील मुक्त व जबाबदार पत्रकारितेचे प्रतिक 16 नोव्हेंबर हा दिवस आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता पणजीतील मिनेझीस ब्रागांझा संस्थेच्या परिषदगृहात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रीय पत्रकारिता दिनाचे उद्घाटन करण्यात येईल. 

माहिती खात्याचे सचिव संजय कुमार यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. माहिती खात्यातर्फे गोवा एडिटर गील्ड, गोवा पत्रकार संघ, गोवा छाया पत्रकार संघ, गोवा इलेक्ट्रोनिक मिडिया पत्रकार संघ,  क्रीडा पत्रकार संघटना आणि दक्षिण गोवा पत्रकार संघटनेच्या सहकार्याने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात येईल.

यावेळी विल्फ्रेड पिरेरा, सुरेश वडावडेकर, अनंत साळकर, सुरेश नाईक आणि सोयरू कोमरपंत यांचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. तसेच गोवा राज्य छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन योजनेखाली आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेत्याना बक्षिसे वितरीत करण्यात येईल.

छायाचित्र स्पर्धा गट – १ पर्यावरणासाठी पर्यावरणाचे संवर्धन आणि गट – २  कोविडवर मात करण्यासाठी पायाभूत आणि  तत्सम सुविधा अशा विषयांवर दोन गटात घेण्यात आली.

गोवा राज्य छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन योजनेखाली दोन गटात आयोजित केलेल्या स्पर्धेचे दोन्ही गटाचे पहिले बक्षिस गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक याना, नारायण पिसुर्लेकर याना दुसरे, मयुर नाईक याना तिसरे बक्षिस प्राप्त झाले. शुभम व्ही नेवगी, अरूनभ भट्टाचारजी, शैलेंद्र नाईक, सपनेश तवडकर आणि गणेश शेटकर  याना उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त झाली.

दुसऱ्या गटाचे दुसरे  बक्षिस उपेंद्र नाईक, तर तिसरे बक्षीस अमेय नाईक याना  मिळाले. गणेश शेटकर, नारायण पिसुर्लेकर,  अरूनभ भट्टाचारजी  याना उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त झाली.

प्रसिध्द छायाचित्रकार प्रसाद पानकर,कला महाविध्यालयाचे प्रा. विली गोंयस माहिती खात्याचे वरिष्ठ छायाचित्रकार सिल्वेस्टर इस्तिबेरो यानी स्पर्धेचे परिक्षण केले.

माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे पुरस्कार जाहीर

माहिती आणि प्रसिध्दी खात्याने गोवा राज्य पत्रकार पुरस्कार जाहीर केले आहेत. हे पुरस्कार एकूण सात गटामध्ये देण्यात येतात. १० हजार रूपये रोख, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोख्याचा उत्कृष्ट संपादक पुरस्कार नवप्रभाचे संपादक परेश प्रभू याना त्याच्या गाधीजी समझून घेऊया याला, ग्रामीण लिखाणासाठी तरूण भारतला लिखाण करणारे महेश गांवकर याना, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता लिखाणासाठी गोवन वार्ताचे प्रसाद शेट काणकोणकर याना महिला आणि बाल/ सामाजिक विषयावर लिखाणासाठी गोवन वार्ताचे सिध्दार्थ कांबळे याना, क्रीडा लिखाणासाठी टाईम्स ऑफ इंडियाचे मार्कुस मेर्गुलाव याना, कला व संस्कृती लिखाणासाठी लोकमतचे गणेश शेटकर याना आणि छायाचित्र पुरस्कार टाईम्स ऑफ इंडियाचे राजतिलक नाईक याना प्राप्त झाले आहेत.

१६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकारितादिनी पुरस्कार प्रदान करण्यात येतील. राज्य पुरस्कार समितीत संदेश प्रभूदेसाई, विली गोंयस आणि जयंत संभाजी यांचा समावेश आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!