23, 24 जुलै रोजी जे.पी.नड्डा गोव्यात

२०२२ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा विशेष ठरणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 23 आणि 24 जुलै रोजी गोव्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा विशेष ठरणार आहे. या दौऱ्या दरम्यान जे.पी. नड्डा पक्षाच्या विविध शाखांशी बैठक घेतील.

हेही वाचाः Tokyo Olympics : ‘या’ दोन देशाच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा

या दोन दिवसांच्या दौऱ्यात जेपी नड्डा यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष आणि गोवा प्रभारी सीटी रवी हेदेखील हजर असणार आहेत. यावेळी फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीवर भर देण्यात येणार आहे.

हेही वाचाः अंजुणे धरणातील पाण्याची पातळी वाढली

23 आणि 24 जुलै रोजी जे.पी. नड्डा गोव्यात

तानावडे म्हणाले, 12 आणि 13 जुलै रोजी दोन दिवस जे.पी.नड्डा गोव्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी त्यांनी विविध बैठकांचं आयोजन केलंय. पार्टीच्या राज्यातील आमदारांसोबत त्यांची एक बैठक होणार असून मंत्री, आमदार आणि खासदारांसोबत एक बैठक; मंत्र्यांसोबत एक बैठक; पार्टीची कोअर टीम, भाजप प्रदेश पदाधिकारी, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, पक्षाच्या राज्यातील मोर्चांचे अध्यक्ष आणि सरचिटणीस अशा विविध बैठका होणार आहेत. सोशल मीडिया सेल सोबत बैठकही ते घेणार आहेत.

हेही वाचाः नवरा शेवटच्या घटका मोजतोय, त्याच्या शुक्राणूपासून मला मातृत्व हवंय, मला परवानगी द्या

2022 विधानसभा निवडणुकीत कमळच फुलणार

6 महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर भाष्य करताना तानावडे म्हणाले, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वतःच्या बळावर जिंकून येणार हे 100 टक्के नक्की आहे. निवडणुका उद्या जरी घेण्यात आल्या तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत. दुसरं म्हणजे पत्रकार परिषदेत घोषणा करून कुणालाच पक्षाचं तिकिट मिळणार नाही. कुणाला तिकिट द्यायचं कुणाला नाही याचा निर्णय हा सर्वस्वी पक्षाचं संसदीय मंडळ घेणार आहे. अजून निवडणुकांसाठी 6 महिन्यांचा अवकाश आहे. त्यामुळे उमेदवारांविषयी अजून तसं काही ठरलेलं नाही. तसंच एकाच कुटुंबातील 4-5 जणांना भाजप तिकिट देणार नाही, असा खुलासाही तानावडेंनी केलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | मांद्रेतील विद्यार्थ्यांना Free WiFi Hotspot

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!