नारायण राणे यांना करोनाची लागण

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस राहणार आयसोलेट. ट्विटरवरून दिली माहिती.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना कोविड-19ची लागण झाली आहे. आपल्याला करोनाची लागण झाली असून उपचार सुरू आहेत, अशा आशयाचं ट्विट राणे यांनी केलं आहे.

नारायण राणे हे महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात मास लिडर म्हणून ओळखले जातात. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. करोनाच्या महामारीतही फिल्डवर सक्रिय असल्यामुळे त्यांचा अनेकांशी रोज संबंध येत असतो. यातूनच त्यांना करोनाबाधा झाली असावी, अशी शक्यता आहे.

”माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.” असं ट्विट राणे यांनी केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.