नारायण नाईक हल्ला प्रकरणः हल्लेखोर आरोपी इस्माईल शेखला अटक

सोमवारी दुपारी केली अटक; माजोर्डा येथे घेतलं ताब्यात; पोलिसांनी जारी केली होती लुकआऊट नोटीस

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक हल्ला प्रकरणातील महत्त्वपूर्ण घडामोडीत क्राईम-ब्राँच पोलिसांनी आज दुपारी फरार असलेला मुख्य हल्लेखोर आरोपी इस्माईल शेख उर्फ कब्बू याला माजोर्डा येथे अटक केली. यापूर्वीच फरार असलेला आरोपी, त्याचा एक साथीदार खलिल फकिरला मुरगाव पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी षड्यंत्र रचणारा राम गोपाल यादव उर्फ ​​करिया याला यापूर्वीच अटक केली आहे आणि गुन्हे शाखेने यापूर्वी दोन्ही हल्लेखोरांबद्दल लुकआऊट नोटीसही जारी केली होती.

काय आहे प्रकरण?

राज्यातील आरटीआय कार्यकर्त्यांवर होणारे हल्ल्यात ३ जुलै रोजी भर पडली होती. ३ जुलैला नारायण नाईक हल्लाप्रकरणी हल्ला करण्यात आला होता. दोघांनी येऊन लोखंडी रॉडने नारायण नाईक यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनीही तत्काळ तपासाची सूत्र हलवत मुख्य संशयित आरोपीला ताब्यात घेतलं होतं. मुख्य संशयित आरोपी करीया यानं आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. मात्र अजूनही या हल्ल्याप्रकरणावरुन अनेक सवाल उपस्थित केले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता ज्यांनी हल्ला केला, त्यांचा शोध लवकर लागावा यासाठी पोलिसांना लुकआऊट नोटीस जारी केलेली.

कोण आहेत नारायण नाईक?

नारायण नाईक हे सामाजिक कार्यकर्ते असून ते आरटीआय एक्टिव्हिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी पंचायत क्षेत्रातील कोमुनिदाद जमिनीवर बड्या बिल्डरांनी केलेला कब्जा, बेकायदा बांधकामं आदी अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी आरटीआयच्या माध्यमातून भानगडी उघडकीस आणल्या होत्या. या सगळ्या भानगडीत अप्रत्यक्षपणे त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले. त्यातूनच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Crime | Narayan Naik Attack | कब्बूच्या नावाचा खलीलनं वाचला पाढा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!