साळगाव मतदारसंघातील मतदार यादीत असंख्य बोगस मतदारांची नावे

साळगाव येथील आरजीच्या रोहन कळंगुटकरांनी केला गौप्यस्फोट; मतदार यादीची पडताळणी करताना झालं उघड

Goan Varta Live | प्रतिनिधी

साळगाव: साळगाव मतदारसंघातील कुमयामरड गिरी भागात एका घर क्रमांकावर सुमारे दोन ते दहा अशा प्रकारे असंख्य बोगस मतदारांची नावे मतदार यादीत घुसवली आहेत. हे मतदान यादीची पडताळणी करताना उघड झालं आहे, अशी माहिती रेव्होल्यूशनरी गोवन्सच्या (आरजी) साळगावचे रोहन कळंगुटकर यांनी दिली आहे.

हेही वाचाः मुलभूत हक्क मिळवण्यासाठी आरजीच्या लढ्यात सहभागी व्हा

घर मालकांना अंधारात ठेवून केला कारभार

घर मालकांना अंधारात ठेवून परप्रांतीयांची अनेक नावं मतदार यादीत घुसवली आहेत. सदर परप्रांतीय त्या घरातही राहत नाही. या भागातील अशी असंख्य बोगस मतदार नावं मतदार यादीत आहेत. याला तेथील स्थानिक बीएलओ तसंच मामलेदार अधिकारी जबाबदार असल्याचं कळंगुटकरांंचं म्हणणं आहे. परप्रांतीयांच्या कागदपत्रांची छाननी न करता त्यांची नावं मतदार यादीत कशी काय घातली? असा सवाल कळंगुटकरांनी उपस्थित केला आहे.

बोगस मतदारांची नावे त्वरित काढून टाकावीत

या भागातील मतदार यादीतील सर्व बोगस मतदारांची नावे त्वरित काढून टाकण्यात यावी. तसंच गोव्यातील मतदान हक्क दुहेरी पद्धतीने परप्रांतियांना देणं योग्य नव्हे. लोकप्रतिनिधी दबावाखाली ही बोगस मतदारांची नावं मतदार यादीत घुसवण्यात आली असावीत, असं कळंगुटकर पुढे बोलताना म्हणाले.

हेही वाचाः साखळीत ‘आरजी’च्या जनसंपर्क मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तर संबंधित अधिकारी गद्दार असल्याचं जाहीर करणार

कुमयामरड गिरी या भागातील अशोक पाळणी यांचा घर क्रं.१३५ /२ देऊन पवार नामक दोन नावं मतदार यादीत घुसवण्यात असल्याचं उघडकीस आल्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं.
लवकरच साळगाव मतदारसंघाच्या मतदार यादीतील बोगस मतदारांची नावं पुराव्यासह उघड करण्यात येतील. मतदार यादीतील सदर बोगस मतदारांची नावं काढून न टाकल्यास संबंधित अधिकारी गद्दार असल्याचं जाहीर करण्यात येईल, असं ते शेवटी बोलताना म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः DAJI KASKAR FASTING | पेडण्यात स्थानिक आमदारच देण्यासाठी दाजी कासकर करणार उपोषण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!