‘मोपा’ला भाऊसाहेबांचे नाव द्या !

अन्यथा ढवळीकरांनी सरकारमधून बाहेर पडावे : कोटकर, मांद्रेत धरणे आंदोलन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : मोपा विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे आणि जर भाऊसाहेबांचे नाव देण्यास सरकार अपयशी ठरले तर मगोचे नेते तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारमधून बाहेर पडावे, अशी मागणी पेडण्याचे माजी आमदार परशुराम कोटकर यांनी धरणे आंदोलनावेळी केली.
हेही वाचाःआठ फुटीर आमदारांना अपात्र ठरवा…

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीतर्फे मधलामाज – मांद्रे येथील भाऊसाहेब बांदोडकर पुतळ्याच्या परिसरात रविवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित केले होते. यावेळी मोपा विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव द्यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आणि तसा ठराव संमत करण्यात आला. कोटकर यांनी पुढे सांगितले की, मांद्रेतून मगोच्या चिन्हावर आमदार म्हणून जीत आरोलकर तर मडकईतून सुदिन ढवळीकर विजयी झालेले आहेत. मगो पक्षाचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी निदान आता तरी या नेत्यांनी भाऊसाहेबांच्या नावाची शिफारस स्वतःहून करायला हवी होती परंतु ती केली नाही, त्याबद्दल खंत वाटते.
हेही वाचाःम्हापशातील सुपरक्रॉस चॅम्पियनशीप स्पर्धेत स्पर्धकाचा मृत्यू…

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे संजय बर्डे, समितीचे निमंत्रक सुभाष केरकर, श्रीधर मांजरेकर, निमंत्रक गजानन मांजरेकर, तरणी गावकर, विनायक च्यारी, अमृत आगरवाडेकर, ताम्हणकर, उमेश तळवणेकर, दीपेश नाईक, तुषार टोपले आदी यावेळी उपस्थित होते.भाऊसाहेबांचेच नाव मोपा विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी गजानन मांजरेकर यांनी केली.
हेही वाचाःउसन्या १५० रुपयांसाठी मित्राचा खून…

भाऊसाहेबांशिवाय पर्याय नाही : खलप

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी सांगितले, भाऊसाहेबांचेच नाव मोपा विमानतळाला द्यावे त्यावर आणखी चर्चा वाढवण्याची किंवा आंदोलन करण्याची गरज नाही. भाऊसाहेब हे सर्वसामान्यांचे नेते होते, त्यामुळे त्यांचे नाव अग्रक्रमाने द्यावे.
हेही वाचाःआंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे पर्यटनाला वाव : मुख्यमंत्री सावंत

शिरोडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव

यावेळी पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांनी सर्वांत प्रथम मोरजी ग्रामसभेत मोपा विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्यावे असा ठराव मांडून तो मंजूर करून घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला.
हेही वाचाःIRONMAN 70.3 GOA: एरोस्पेस अभियंता निहाल बेगने पटकावले विजेतेपद…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!