परप्रांतिय महिलेचा गोव्यात खून ; मात्र पती…

Goan Varta Live | प्रतिनिधी
डिचोली : डिचोली वाठादेव सर्वण येथे परप्रांतिय महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनाचा हा प्रकार काल घडला असावा असा अंदाज आहे. आज (शुक्रवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास चालू आहे.
हेही वाचाःगोवा प्रशासकीय लवादाचे कर्मचारी ‘अडचणीत’…
आपण मुलीला घेऊन फिरायला जातोय
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी वाठादेव सर्वण येथे भाड्याचा खोलीत परप्रांतिय महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. मृत महिला, तिचा नवरा आणि ४ वर्षांच्या मुलीसह भाड्याचा खोलीत महिन्याभरापासून रहात होती. गुरुवारी सकाळी तिचा नवरा आपल्या मुलीला घेऊन बाहेर पडत असताना शेजाऱ्यांनी पाहिले आणि विचारले असता आपण मुलीला घेऊन फिरायला जातोय असे त्याने सांगितले.
खोलीतून ऐकू आला मांजरीचा आवाज
आज (शुक्रवारी) सकाळी त्या खोलीतून मांजरीचा आवाज ऐकू आला म्हणून शेजारील लहान मुलग्याने भाड्याच्या खोलीच्या दाराच्या फटीतून आत डोकावून पाहिले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना घटनास्थळी एक तुटलेला मोबाईल सापडला आहे. सद्या तिचा पती बलराम यादव त्याच्या ४ वर्षांच्या मुलीसह फरार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचाः१२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पर्यटक म्हणून…