ELECTIONS | पालिका, मनपा निवडणुकाही २० मार्चला शक्य

पंचायत, जिल्हा पंचायत पोटनिवडणुकांची अधिसूचना जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पालिका, मनपा निवडणुका तसंच ग्रामपंचायत, जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुका एकाच दिवशी घेण्यात येतील, असं राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयास सांगितलं होतं. त्यानंतर आता ग्रामपंचायत व जिल्हा पंचायत निवडणुका येत्या २० मार्च रोजी घेण्यात येणार असल्याची अधिसूचना पंचायत खात्याने बुधवारी जारी केली आहे. त्यामुळे अकरा नगरपालिका आणि पणजी मनपाच्या निवडणुकाही २० मार्च रोजीच होण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः राज्यातील पालिका आणि पंचायत पोटनिवडणुका एकत्रच

बुधवारी जारी करण्यात आली अधिसूचना

पंचायत खात्याचे सचिव संजय गिहार यांनी बुधवारी अधिसूचना जारी करीत राज्यातील विविध ग्रामपंचायती तसंच दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघातील पोटनिवडणूक २० मार्च घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने उच्च न्यायालयात सर्वच निवडणुका एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. शिवाय २४ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनासही प्रारंभ होणार आहे. त्यामुळे पालिका आणि मनपा निवडणुकाही २० मार्च रोजीच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!