भारीच! गोव्याच्या सुनेला राष्ट्रप्रेरणा पुरस्कार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौरव

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : गोव्याची सून तथा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना यंदाचा राष्ट्रप्रेरणा पुरस्कार मिळाला आहे. इंदौर इथली वैकल्पिक चिकित्सा पद्धती विकास संस्था, आणि वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्डस् यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे.

या दोन्ही संस्थांनी नुकतीच आत्मनिर्भर भारत राष्ट्रीय परिषद- २०२० इंदौर इथं आयोजित केली होती. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या, देशभरातल्या निवडक मान्यवरांना राष्ट्रप्रेरणा पुरस्कार घोषित करण्यात आले.

किशोरी पेडणेकर यांना उल्लेखनीय वैयक्तिक कामगिरी, राष्ट्रीय कार्यामध्ये अतुलनीय योगदान आणि सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!