मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ देण्याचे संकेत

सोमवारी मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात झाली सुनावणी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजीः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा या सगळ्याचाच मोठा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारानं आधी कडक निर्बंध आणि त्यानंतर कर्फ्यूसारखे निर्णयही घेतले. दरम्यान, आता तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने थेट सरकारला अ‍ॅक्शन प्लॅनच देण्याबाबतचे संकेत दिलेत.

हेही वाचाः ‘नितळ डिचोली’ सत्यात उतरवण्याचा संकल्प

येत्या गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात सोमवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीत ईव्हरमेक्टीनचा वापर, ब्लॅक फंगस, वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण, लस खरेदी या सगळ्यासोबत कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबतही प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. येत्या गुरुवारपर्यंत हे प्रतीज्ञापत्र राज्य सरकारला हायकोर्टात सादर करावं लागणार आहे. त्यानंतर शुक्रवारी म्हणजे 28 मे रोजी याबाबत पुढील सुनावणी होणार आहे. 

हेही वाचाः गुन्ह्यांचा छडा लावण्याचं प्रमाण 80.25 टक्के

28 मे रोजी पुढील सुनावणी

सध्या राज्यात दुसऱ्या लाटेचा सामना करताना अनेक गोष्टी या प्रामुख्यानं समोर आल्या. त्यातच ईव्हमेक्टीनच्या वापरावरुनही बराच वाद झाला होता. त्यानंतर आता कोरोनातून रिकव्हर झालेल्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचा धोका उद्भवू लागलाय. अशातच पुरेशा लसी नसल्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचं लसीकरणही काही काळासाठी थांबवावं लागलंय. अशा सगळ्या परिस्थितीत तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, काय उपाययोजना केल्या जातात, हे पाहणं महत्त्वाचंय. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्य सरकार नेमकं प्रतीज्ञापत्रात काय सांगतं, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, सध्या टास्क फोर्सच्या माध्यमातून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बाबींवर सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना तयार करण्याचं कामही सुरु झालेलं आहे. त्यामुळे आता तिसरी लाट जर आलीच, तर तिचा सामना करण्यासाठी नेमक्या कशा पद्धतीनं पावलं उचलण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह प्रशासन सज्ज राहतं, हे जाणून घेणं महत्त्वाचंय. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी 28 मे रोजी होणाऱ्या सुनावणीलाही महत्त्व प्राप्त झालंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!