मुंबई गोवा महामार्ग ठप्प; कणकवलीत वागदेजवळ हायवेवर पाणीच पाणी

मुसळधार पावसाने कोकणाला झोडपलं, वाहतुकीवर परिणाम

Goan Varta Live | प्रतिनिधी

कणकवलीः सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसाचा फटका कणकवली तालुक्याला बसला असून मागचे काही दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीत तालुक्‍यातील काही भागांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला असून कणकवलीत वागदेजवळ हायवेवर पाणीच पाणी दिसतंय.  

हेही वाचाः बलात्कार प्रकरणातील संशयित रहिम खान याला उत्तरप्रदेश मुरादाबाद येथून अटक

वागदे​-कसवण​-आंब्रड जाणारा रस्ता खचला

कणकवलीतील बिडवाडी-सांडवे रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प तर बिडवाडी गावातील पाच वाड्यांचा संपर्क तुटला. कणकवली अतिवृष्टीतमुळे वागदे​-कसवण​-आंब्रड जाणारा रस्ता खचला आहे. रस्त्याचा काही भाग जवळपास एक ते दीड फूट खचल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. वागदे मांगरवाडी येथे हा रस्ता खचल्याने मोटरसायकल वगळता, या मार्गावरील अन्य वाहतूक ठप्प आहे. दोन वर्षापूर्वी येथील रस्त्याचा काही भाग खचला होता. मागचे काही दिवस पाऊस न थांबता कोसळत असल्यामुळे ही पूर स्थिती निर्माण झालीये.

हेही वाचाः पावसाची खबरबात! आज रेड तर उद्या परवा ऑरेंज अलर्ट

पोलिसांचा फौज-फाटा तैनात

मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याचं रुपांतर तळ्यात झाल्यामुळे गोव्याच्या दिशेने येणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या अर्ध्यावरच अडकून पडल्यात. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेता वाहनांना पुढे जाण्यापासून अडवण्यासाठी या कणकवलीत वागदेजवळ पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. लोकांना स्वतःचा जीव धोक्यात न घालण्याचं आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!