मुंबई-गोवा महामार्ग ठप्प ; कणकवली-वागदेत पुन्हा पाणी

पहाटेपासून बंद करण्यात आली वाहतूक

उमेश बुचडे | प्रतिनिधी

कणकवली : मध्यरात्री पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली वागदे वक्रतुंड हॉटेलसमोर पाणी आल्याने हायवे बंद करण्यात आला आहे. पाणी वाढत असून वागदे गावातील काही वाड्यांना पाण्याने वेडा घातलाय. रस्ता खचून दुकानात पाणी गेले व घरातही पाणी घुसल्यानं भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी पहाटे 3 वाजल्यापासून हे पाणी आल्याची माहिती वागदे पोलीस पाटील सुनील कदम यांनी दिली. वागदे माजी सरपंच सावंत व ग्रामस्थ यांच्यामार्फत मदतकार्य सुरू आहे. पोलीस घटनास्थळी दखल झाले आहेत.

कणकवली तालुक्‍यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे ढग फुटी झाली की काय असे वाटत आहे. कारण मुंबई-गोवा महामार्गवर कणकवली वागदे येथे काल दुपारी बाराच्या दरम्यान पाणी आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला होता. पण सायंकाळी पुन्हा पाणी ओसरल्यावर सुरू करण्यात आला. आता पाण्याचे प्रमाण खूपच वाढल्याने वाहतूक पहाटेपासून पुर्णतः बंद करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!