मुंबई आणि गोवा एनसीबीची संयुक्त कारवाई, अर्जुन रामपालचा मेहुणा अ‍ॅगिसिलोसला पुन्हा अटक!

अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सच्या चौकशी दरम्यान अनेक नावे समोर; ‘हॅश’ आणि ‘अल्प्राझोलम’ हे ड्रग्जदेखील जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्स प्रकरण समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या हिच्या भावाला पुन्हा अटका केली आहे. मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबीची संयुक्त कारवाई करत अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला बेड्या घातल्या आहेत. त्याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत या प्रकरणात अनेकांना ताब्यात घेतले गेले आहे. याआधीही एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले गेले होते. ड्रग्ज कनेक्शन तपासादरम्यान नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सच्या चौकशी दरम्यान अनेक नावे समोर आली होती.

अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सकडून ड्रग्ज जप्त

दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. शिवाय त्याचाकडून ‘हॅश’ आणि ‘अल्प्राझोलम’ हे ड्रग्जदेखील जप्त करण्यात आले आहेत. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, काही कालावधीनंतर त्यांला जामीन देण्यात आला होता.

कोण आहे अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स?

अर्जुन रामपाल याची लिव्ह इन गर्लफ्रेंड गब्रिएला हिची देखील चौकशी करण्यात आली होती. अर्जुन आणि गब्रिएला हे दोघे वांद्रे येथे राहतात. त्यांच्या सोबत गब्रिएला हिचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स हा देखील राहत होता. गेल्या महिन्यात एनसीबी अधिकाऱ्यांनी अ‍ॅगिसिलोस याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले होते. वेगवेगळ्या प्रकारचे हे ड्रग्ज होते. तपासात अ‍ॅगिसिलोस हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांच्या संपर्कात असल्याचं उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

अ‍ॅगिसिलोस, अर्जुन रामपाल याच्या घरी राहत असल्याने अर्जुन रामपाल ही एनसीबी अधिकाऱ्याच्या रडारवर आला होता. अ‍ॅगिसिलोसने आपल्याला जामीन मिळावा म्हणून मुंबई सेशन कोर्टात अर्ज केला होता. अखेर आज (15 डिसेंबर) त्याला पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. यावेळी त्याने पासपोर्ट जमा करावा, तसेच देश सोडून जाऊ नये, कुठे जायचे असल्यास परवानगी घेऊन जावं, असं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं होते.

अर्जुन रामपालची झाली होती चौकशी

एनसीबीने यापूर्वीही अर्जुन रामपाल याला चौकशीसाठी बोलावलं होतं. 17 नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपाल याची सहा तास चौकशी झाली होती. यात अर्जुन रामपाल याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अर्जुनच्या घरी ट्रामाडॉल या औषधांच्या गोळ्या सापडल्या होत्या. या औषधावर भारतात बंदी आहे. या टॅब्लेट ड्रग्ज प्रकारात मोडतात. याबाबत अर्जुन रामपाल याला खुलासा करायचा होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!