मालपेची उतरण बनली अपघाताचा सापळा

चिखलमय रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता. दीड किलोमीटर लांबीचा रस्ता बनला धोकादायक.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : मालपे इथल्या हमरस्त्यावर चिखल झाल्याने सुमारे दीड किलोमीटर लांबीचा रस्ता अपघाताचा सापळा बनला आहे. या ठिकाणची माती तत्काळ काढावी, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

मालपे उतरणीवरील वळणावर मुरूम माती नेणार्‍या ट्रकमधून माती सांडते. पावसामुळे साधारणपणे दीड किलोमीटरचा रस्ता चिखलमिश्रित झाला आहे. या निसरड्या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषत: दुचाकी वाहन चालविणार्‍यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

पोलिस तैनात करा!
मालपे चढणीच्या माथ्यावर काही पोलिस नियम न पाळणार्‍या वाहनाचालकांना दंड ठोठावण्यासाठी तैनात केले आहेत. मात्र या धोकादायक रस्त्यावर पोलिस दिसत नाहीत. या ठिकाणी पोलिस तैनात करावेत. तसेच पाण्याने चिखल धुउन रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. अपघात होण्याची वाट न बघता संबंधितांनी या रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!