श्रीमती कमलाबाई हेदे विद्यालयाचा निकाल 100 टक्के

मुलींनी मारली बाजी; विद्यार्थीनी मेघना जोगर 94 टक्के गुण मिळवत आली पहिली

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः गोवा शालान्त व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील श्रीमती कमलाबाई हेदे विद्यालयाचा यंदाचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षक तसंच पालकांकडून कौतुक होतंय.

हेही वाचाः यशवंत-कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घ्या

मुलींनी मारली बाजी

विद्यार्थीनी मेघना हनुमंतराज जोगर या विद्यार्थीनीने 94 टक्के गुण मिळवले असून तिने विद्यालयाता पहिली येण्याचा मान मिळवला आहे. तसंच विद्यार्थीनी रिद्दी रोहिदास कुंकळ्येकर हिने 93 टक्के गुण प्राप्त करत द्विती, तर विद्यार्थीनी वासवी विनोद नाईक हिने 92 टक्के गुण मिळवत विद्यालयात तिसरी येण्याचा मान मिळवला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थीनी सिमरन निजामुद्दीन शेख ही विद्यार्थीनी 89 टक्के गुण मिळवत विद्यालयातून चौथी आली आहे.

हेही वाचाः ‘द सपोर्ट ग्रुप फॉर कोविड वॉरियर्स इन गोवा’ ट्रस्टतर्फे कोविड योद्ध्यांसाठी ८ रुग्णवाहिका

28 मुलांनी दिली होती परीक्षा

यंदा श्रीमती कमलाबाई हेदे विद्यालयातून 28 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. पैकी 7 विद्यार्थ्यांना डिस्टिक्शन, 10 विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास, तर 11 विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये पास झालेत.

हेही वाचाः काणका-पर्रा रस्त्यावरील बेकायदा दुकानवजा गाळ्यांवर कारवाई

विद्यालयाची 100 टक्के निकाल देण्याच्या परंपरा कायम

श्रीमती कमलाबाई हेदे विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास पाटील, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत हेदे, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष रूपेश नाईक तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात येतंय. 100 टक्के निकाल देण्याच्या विद्यालयाच्या यशस्वी परंपरेबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येतंय.

हा व्हिडिओ पहाः HSC Result 2021 | धाकधूक संपली! अखेर बारावीचा निकाल लागला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!