नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्री सावंतांची भेट
सरकारी बंगल्यावर राणे-सावंत भेट

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
पणजी : भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेतली आहे. यावेळी नारायण राणेंनी वेगवेगळ्या विषयांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय.
मुख्यमंत्र्याच्या सरकारी निवासस्थान असलेल्या आल्तिनो या पणजीतील महालक्ष्मी बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट त्यांसोबत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.