गोवा ब्रांच ऑफ चार्टर्ड अकाउंट्स संघटनेने घेतली मॉविन गुदिन्होंची भेट

पंचायतींमध्ये डबल एन्ट्री सिस्टम लागू करण्याची केली मागणी

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोवा ब्रांच ऑफ चार्टर्ड अकाउंट्स संघटनेने आज पंचायत मंत्री मॉविन गुदिन्होंची भेट घेत पंचायतींमध्ये डबल एन्ट्री सिस्टम लागू करून सुरू करण्याची मागणी केली. ही पद्धत लागू केल्यास पंचायतींना जास्त फंड किंवा बॅंकांमधून लोन घ्यायला मिळणार असल्याचा दावा संघटनेने केलाय. पंचायत मंत्र्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं संघटनेच्या सदस्यांनी सांगितलं.

हेही वाचाः भर पावसात नारायण राणे बरसले !

यावेळी सेंट्रल काऊन्सिल मेंबर चंद्रशेखर चितळे, गोवा ब्रांच ऑफ चार्टर्ड अकाऊंट अध्यक्ष प्रदीप काकोडकर, वेस्टर्न इंडिया रिजनल काऊन्सिल ऑफ आयसीएआयचे अध्यक्ष मनीष घाडीया यांची उपस्थिती होती.

पुढील निर्णय लवकरच घेऊ

चार्टर्ड अकाउंट संघटनेसोबत माझी चर्चा झालीये. त्यांनी मला डबल एन्ट्री सिस्टमचे फायदे सांगितलेत. ही सिस्टम लागू केल्यास पंचायतींमध्ये जे हाऊस टॅक्स कलेक्शन होत नाही ते देखील होणार आहे. जीपार्ड, पंचायत संचालक तसंच इतरांशी एकत्र चर्चा करुन पुढील निर्णय लवकरच घेतला जाईल, असं गुदिन्हो म्हणालेत.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | Girls Safety | गोव्यातील मुलींना राज्यात सुरक्षित वाटतंय का?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!