प्रत्येक पिढीला चित्रपट प्रेरणा देतात : डॉ. तारिक थामस

भारतीय विज्ञान चित्रपट २०२१ महोत्सवाच्या ६व्या आवृत्तीचा समारोप समारंभ संपन्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: प्रत्येक पिढीला चित्रपट प्रेरणा देतात. चित्रपटांमध्ये कल्पनाशक्तीला प्रेरणा देण्याची आणि प्रभाव निर्माण करण्याची शक्ती असते. चित्रपटांकडे प्रचंड क्षमता आहे. चित्रपटांच्या माध्यमातून संपूर्ण पिढी प्रेरित होऊ शकते जो एक उत्तम प्रयत्न आहे. विज्ञान सुंदर आहे आणि त्यातून प्रेरणा घेण्याची क्षमताही आहे. विज्ञानाचा जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो आणि स्वप्न पाहण्यास मदत करणारं हे साधन आहे असं प्रतिपादन गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तारिक थॉमस आय.ए.एस यांनी पणजीत आयोजित केलेल्या सहाव्या विज्ञान चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळयाप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले. यावेळी आयआयटी गोवाचे संचालक डॉ. बी. के. मिश्रा, विज्ञान प्रसारकचे डॉ. अरविंद रानडे, विज्ञान भारतीचे जयंत सहस्रबुद्धे, गोवा विज्ञान परिषदेचे सुहास गोडसे उपस्थित होते.

हेही वाचा VIRAL FACT | चांदेल पेडणेत प्रवाशांचा बसच्या टपावरून जीवघेणा प्रवास

गोवा आता प्रतिष्ठित संस्थांच्या उपस्थितीचा शैक्षणिक लँडस्केप आहे

सोहळ्यातील उपस्थितांनी भारतीय विज्ञान चित्रपट २०२१ चा वार्षिक अहवाल एका दृकश्राव्य स्वरुपात पाहिला, ज्यात महोत्सव समितीने केलेल्या विविध क्रिया दर्शविल्या गेल्या होत्या. यावर भाष्य करताना आयआयटी गोवाचे संचालक डॉ. बी. के. मिश्रा म्हणाले, या महोत्सवासाठी आयोजकांनी बरीच मेहनत घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करू इच्छितो व विद्यार्थ्यांनीदेखील त्यांची उत्सुकता आणि त्यांची प्रामाणिकता दर्शविली आहे. गोवा आता प्रतिष्ठित संस्थांच्या उपस्थितीचा शैक्षणिक लँडस्केप आहे आणि पुढच्या वर्षी, मला आशा आहे की आमच्याकडे आणखी रोमांचक कार्यक्रम घडतील.

हेही वाचा – 22 मार्चला निकाल लावू नका, थोडं थांबा, आमोणकर म्हणतात…

विद्यार्थी समाजात विज्ञान संकल्पनांचा प्रचार करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम

यावर्षी हा महोत्सव १७ आणि १८ मार्च २०२१ रोजी पार पाडण्यात आला आणि त्यात चार विज्ञान फीचर चित्रपटांचे प्रदर्शन, इनोव्हेशन एक्झिबिशन, शिक्षकांसाठी कार्यशाळा तसंच विज्ञान चित्रपट निर्मितीवरील मास्टर क्लास या कार्यक्रमांचा समावेश होता. विद्यार्थी समाजात विज्ञान संकल्पनांचा प्रचार करण्याच्या उद्देशाने हे विविध कार्यक्रम रचले गेले होते. या कार्यक्रमात इनोव्हेशन एक्झीबिशनचा अहवालही सादर करण्यात आला ज्यामध्ये विविध संस्थांमधून एकूण ३० प्रदर्शकांनी भाग घेतल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर सहाव्या ते अकरावीच्या राज्यस्तरीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी विज्ञान मंथन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

हेही वाचा – Video | Exclusive | नव्या आरक्षणावरुन कोर्टात जाण्याचा दयेश नाईकांचा इशारा

हा उत्सव एक अनोखा प्रकार

यावर विज्ञान प्रसारकचे वैज्ञानिक एफ, डॉ. अरविंद रानडे यांनी विजेत्यांचं तसंच उपस्थितांचं अभिनंदन केलं आणि सांगितलं की, “हा उत्सव एक अनोखा प्रकार आहे. या उत्सवाला खूप महत्त्व आहे आणि विज्ञान चित्रपट महोत्सवाचा प्रवास ध्वज चिन्ह बनण्याच्या दिशेनं जाणारा आहे. या महोत्सवात बरीच क्षमता आहे आणि त्याने आपलं वेगळेपण कायम ठेवलं आहे आणि याचाच एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो.”

हेही वाचा – भयंकर! 24 तासांत 4 कोरोना बळी, 4 पैकी तिघांना फक्त कोरोनाची बाधा

विज्ञानाबद्दल लोकांना जागरूक करणं

विज्ञान परिषद, गोवा ही स्वदेशी विज्ञान चळवळ आहे जी आपल्या मूळ संस्था विज्ञान भारतीकडुन प्रेरणा प्राप्त करते आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. या महोत्सवाचं उद्दिष्ट म्हणजे विज्ञानाबद्दल लोकांना जागरूक करणं. आमच्या माननीय पंतप्रधानांनी आम्हाला आत्मनिर्भर होण्यासाठी सांगितलं आहे म्हणून आपल्यास आत्मविश्वास असणं आवश्यक आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात युवकांमध्ये आत्मविश्वास तसंच आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. हे सर्व देशात विज्ञानाचा विकास व भारतीय विज्ञानाचा प्रवास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याद्वारे साध्य करता येईल. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना नवीन उंचीवर नेण्यासाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे, असं मत राष्ट्रीय भारती संघटना सचिव जयंत सहस्रबुद्धे यांनी वक्तवलं.

हेही वाचाः अजब गजब! विना हेल्मेट ट्रक चालवणाऱ्यास 1000 रुपयांचा दंड?

गोव्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानाशी संबंधित कारकीर्दीत रस उत्पन्न करण्याचा प्रयत्न

मान्यवरांचं स्वागत विज्ञान परिषद, गोव्याचे अध्यक्ष सुहास गोडसे यांनी केलं, ज्यात त्यांनी नमूद केलं की, आम्ही कोविड -१९ च्या सावलीत असलो तरी उत्साह कमी झालेला नाही. दररोजच्या जीवनात विज्ञान संकल्पना राबवून भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव विज्ञानास प्रेरित करेल. गोव्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानाशी संबंधित कारकीर्दीत रस मिळावा हा महोत्सवाचा प्रयत्न आहे.

विज्ञान आणि सिनेमा यांच्यातील सहकार्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांनी साध्य केलेल्या सिनेमा जगात सहभागी झालेल्या लोकांची मनं उघडण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या महोत्सवाने प्रयत्न केले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!