राज्यात शोकाकुल वातावरण; भाजप टीका उत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनात व्यस्त

दिगंबर कामतांची टीका : भाजपची असंवेदनशीलता उघड; राज्यातील मृत्यूंसाठी भाजपच जबाबदार

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः गोव्यात भाजप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे सुमारे 2700 लोकांचा कोविडने बळी घेतला. ऑक्सिजनचा पुरवठा बंद करुन सरकारने लोकांचे जीव घेतला. सरकारच्या नाकर्तेपणाने मृत्यू झोलेल्या शोकाकुल कुटुंबियांच्या घरी समई, मेणबत्त्या पेटवण्याचा प्रसंग आला असताना, भाजप सरकारचे मंत्री आणि पक्षाचे पदाधिकारी दीपप्रज्वलन करून टीका उत्सव साजरे करतात. यावरुन त्यांची असंवेदनशीलता दिसते, अशी घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. केपे गट युवक काँग्रेसच्या अधिकारग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचाः सांतीनेझ गोळीबारप्रकरणी पुण्याहून आणखीन दोघांना अटक

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सरचिटणीस सुभाष फळदेसाई, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, एल्टन डिकॉस्ता, उबेद खान, मेल्वीन कार्वाल्हो, प्रशांत वेळीप आणि ॲड. अर्चित नाईक हजर होते. केपे मतदारसंघातील नगरपालिका आणि पंचायत क्षेत्रातील सुमारे 350 युवकांतर्फे शनिवारी सुमारे 30 जणांनी कोविडची बंधने असल्यानं प्रातिनिधीक स्वरुपात युवक काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

युवक काँग्रेसकडून गोंयकारांना मदत

गोवा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मागील एक महिना कसलीच जाहिरातबाजी न करता शेकडो कोविड रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा तसंच इतर मदत करुन त्यांच्या ह्रदयात स्थान निर्माण केलं आहे. फोटो काढून प्रसिद्धी घेण्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांसाठी लोकांचे आशीर्वाद जास्त मोलाचे आहेत हे युवक काँग्रेसने सिद्ध केलं, असं कामत म्हणाले. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी विधानसभा निवडणुकीत केपेत काँग्रेसचा झेंडा फडकेल याचा मला पूर्ण विश्वास असल्याचंही कामतांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचाः पगाराबाबत आली मोठी बातमी! आता पगाराच्या दिवशी सुट्टी आली तरी नो टेन्शन

कोविड मृत कुटुंबियांना 6 लाख रुपये मिळून देण्यात मदत करावी

भाजप सरकारने आज कोविडच्या संसर्गाने मरण आलेल्यांसाठी नुकसान भरपाई देण्याचं जाहीर केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांसाठी चार लाख आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येकी दोन लाख देण्याची घोषणा केली आहे. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोविडने मृ्त्य आलेल्या कुटुंबियांना एकूण सहा लाख रुपये सरकारकडून मिळवून देण्यास संपूर्ण मदत करावी, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी केलं.

हेही वाचाः शेतीला प्राधान्य देण्यासाठी सदैव प्रयत्न करणार

स्वाभिमानी केपेकर धडा शिकवणार

काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून केपेतील मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांना स्वाभिमानी केपेकर धडा शिकविण्यासाठी सज्ज असून, सत्तेत असूनही मागील जिल्हा पंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत बाबू कवळेकरांच्या समर्थकांची एकूण टक्केवारी जबरदस्त घटल्यानं बाबूचं वजन कमी झाल्याचं सिद्ध झालं आहे. संधिसाधू बाबू कवळेकरांना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्यास सर्व कार्यकर्त्यांनी एकी राखून काम करावं, असं चोडणकर म्हणाले.

हेही वाचाः उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांकडून केपे मतदारसंघात चेनसॉ यंत्रांचे वितरण

आगामी निवडणुकीत काँग्रेस इतिहास रचणार

काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत केपेत एक नवा इतिहास रचणार असून, काँग्रेस सोडून भाजपात केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी गेलेल्यांना केपेकर अद्दल घडवणार आहेत, असं ॲल्टन डिकॉस्ता यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

हेही वाचाः जीसीईटी परीक्षा 27, 28 जुलै रोजी

जनतेला न्याय मिळवून द्या

युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी यावेळी सर्व नवीन सदस्यांना स्थानिक विषय घेऊन जनतेला न्याय मिळवून देण्याचं आवाहन केलं. कोविड महामारीत युवक काँग्रेसने केलेल्या कामाने जनता आज आमच्याकडे विश्वासाने पाहतेय. लोकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावं, असं ते म्हणाले.

हेही वाचाः CRIME | गांजा बाळगल्याप्रकरणी पेडणे पोलिसांकडून एकाला अटक

युवक काँग्रेसची एक मोठी फळी उभी करण्यावर भर

नवनिर्वाचीत केपे युवक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत वेळीप यांनी यावेळी बोलताना ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे कार्य पुढे नेणार असल्याचं सांगितलं. युवक काँग्रेसची एक मोठी फळी उभी करण्यावर भर देणार असल्याचंही ते म्हणाले. आज प्रातिनिधीक स्वरुपात सदस्य झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यामागे किमान दहा युवक कार्यकर्ते असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!