पेडणे मतदारसंघात ‘डास निर्मूलन फवारणी’

मगोप नेते प्रवीण आर्लेकरांचा अनोखा उपक्रम

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग सुरू होणार. एका बाजूने कोरोनाचं महासंकट आहेच. या पार्श्वभूमीवर लोकांचा जीव वाचवण्यासाठी, त्यांना डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या रोगांपासून लांब ठेवण्यासाठी मी ‘डास निर्मूलन फवारणी’ संपूर्ण पेडणे मतदारसंघात सुरू केली आहे. सुरुवात कोरगावातून केली असून इब्रामपूर गावापर्यंत ही फवारणी केली जाईल, अशी माहिती पेडणे मगोप नेते तथा समाजसेवक प्रवीण आर्लेकरांनी दिली.

पेडण्यातील प्रत्येक गावात करणार फवारणी

कोरगावातील मगोप कार्यालयासमोर या डास निर्मूलन फवारणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला मगो पक्षाचे केंद्रीय सदस्य सुदीप कोरगावकर, देवानंद गावडे, जयेश पालयेकर, चंद्रकांत केरकर, महेश परब, सिद्धांत मरूडकर, बबन नाईक, स्मिता राणे, ज्योती कोरगावकर, विनिता मांद्रेकर, उज्जवल गावडे यावेळी उपस्थित होते. डास निर्मूलन फवारणीसाठी पेडणे मतदारसंघात तीन कामगार नेमण्यात आलेत. जोपर्यंत सर्व गावामध्ये फवारणी होत नाही तोपर्यंत हा उपक्रम चालूच राहणार असल्याचं आर्लेकर म्हणालेत.

आगळा-वेगळा उपक्रम

गावात माणसं निरोगी राहिली तर गाव प्रगती करू शकेल. या उद्देशाने मगो पक्षाच्या वतीने संपूर्ण पेडणे मतदारसंघात हा उपक्रम हाती घेतला आहे. असा आगळा वेगळा उपक्रम पहिल्यांदाच गोव्यात होत आहे. किंबहूना मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!