मोरजीत महिलांनी झाडाला बांधला राखीचा धागा

पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे: बागवाडा मोरजी येथील श्री दत्तात्रय देवस्थान, मोरजी सार्वजनिक श्री दुर्गा उत्सव समिती आणि महिला समितीतर्फे रक्षाबंधनाच्या दिवशी झाडांना राखीचा धागा बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात अनेकांना प्राणवायू मिळाला नसल्यानं त्यांचा मृत्यू झाला. आता सर्वांनी आपापल्या परीसरतील झाडांची रक्षा करण्याची गरज असल्याच्या जाणिवेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

हेही वाचाः कोलवाळध्ये 1.310 किलो गांजा जप्त

या उपक्रमात श्रुती केरकर, आरती दाभोलकर, वनिता केरकर, मिलन पेडणेकर, मीरा पिळगावकर, वंशिका पार्सेकर, जोस्ना कन्नाईक, शीतल पार्सेकर, गीता पार्सेकर, सिम्मी केरकर, अंतरा केरकर, समीक्षा बानकर, मिय पोके आणि गीता केरकर या महिला सहभागी झाल्या.

प्रत्येकाने पर्यावरणाची निगा राखण्याची गरज

या उपक्रमाविषयी बोलताना श्रुती केरकर म्हणाल्या, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असं संत महात्म्यांनी सांगून ठेवलंय. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने पर्यावरणाची निगा राखण्याची गरज आहे. म्हणूनच राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही झाडांना धागा बांधून त्यांचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.

हेही वाचाः टाटाच्या सर्वात स्वस्त Micro SUV चं ‘हे’ नाव ठरलं…

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार

राखीचा धागा झाडांना बांधून झाडांचं रक्षण करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जाणकारांनी पूर्वी काही मोठी झाडं देवाचं प्रतिक म्हणून त्यांची पूजा करण्याची प्रथा घालून दिली. तोच धडा आम्हाला आता गिरवायचा आहे, असं अध्यक्ष सुधीर कन्नाईक यांनी बोलताना सांगितलं.

हेही वाचाः काबूल विमानतळावर हल्लेखोर आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये चकमक

या कार्यक्रमात उपस्थितांचं स्वागत आणि प्रास्ताविक सतीश च्यारी यांनी केलं.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | MURDER | चंद्रकांत बांदेकर खून प्रकरणाचा उलगडा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!