मोरजीत 318 नागरिकांनी घेतली लस

2 जून रोजी पार पडला टीका उत्सव; नागरिकांकडून चांगला प्रतिसाद

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः मोरजी पंचायत क्षेत्रातील आरोग्य खात्याने आयोजित केलेल्या टीका उत्सवात 45 वर्षांवरील एकूण 318 नागरिकांनी लस घेतली आहे.

हेही वाचाः पिसुर्लेत चिरेखाणीत महिलेची आत्महत्या

2 जून रोजी पार पडला टीका उत्सव

2 जून रोजी मोरजी श्री कळदेव मांगर सभागृहात आयोजित केलेल्या टीका उत्सवाला सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, पंच तुषार शेटगावकर, पंच मुकेश गडेकर, पंच पवन मोरजे, डॉक्टर तुळसी कोठावळे, कुसाजी नाईक, रुपाली आसोलकर, नविता सातर्डेकर आणि प्राची कशाळकर उपस्थित होते.

दुसऱ्यांदा टीका उत्सवाचं आयोजन

मोरजी पंचायत क्षेत्रातील 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यासाठी दुसऱ्यांदा सरकारने आमदार दयानंद सोपटे यांच्या आणि मोरजी पंचायतीच्या सहकार्याने टीका उत्सवाचं आयोजन केलं होतं. दुसऱ्यांदा आयोजित या टीका उत्सवाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

हेही वाचाः उत्तर गोवा पोलीस अधीक्षकपदावर शोबित सक्सेना यांची बदली

मोरजीत कायमस्वरूपी लसीकरण केंद्र लवकरच

मोरजी पंचायत क्षेत्रातील 45 वर्षांवरील नागरिकांना तुये हॉस्पिटल यासारख्या दूर ठिकाणी जावं लागतंय. यात त्यांचा वेळ वाया जातोय. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी आता मोरजी पंचायत क्षेत्रात कायमस्वरूपी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रे मतदार संघातील पालये, मांद्रे, मोरजी आणि तुये या चार गावात कायमस्वरूपी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू केलं आहेत.

हेही वाचाः म्हादई अभयारण्य अधिकाऱ्याकडून सरकराकडे पोलीस संरक्षणाची मागणी

पंच सदस्यांकडून जागृती

2 जून रोजी आयोजित टीका उत्सवासाठी मोरजी पंचायतीच्या नऊही पंच सदस्यांनी आपापल्या पंचायत क्षेत्रात जनजागृती केल्याने चांगला प्रतिसाद मिळाला, असं आमदार सोपटे म्हणाले.  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!