दुप्पटपेक्षाही जास्त कोरोना रुग्णवाढ झाल्यानं चिंता, मात्र मृत्यूची पाटी कोरी

नवे रुग्ण बरे होणाऱ्यांपेक्षा जास्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण कमी-जास्त होत असून सोमवारपेक्षा मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय दिसून आली आहे. मंगळवारी 141 नव्या कोरोना रुग्णांची भर झाली आहे. रुग्णवाढ जरी जास्त असली तरी मंगळवारी एकाही कोविड बळीची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिलासा व्यक्त केला जातो आहे.

हेही वाचा – धक्कादायक! हा Video पाहा आणि तुम्हीच सांगा या अपघाताला कारणीभूत कोण ते!

सक्रिय रुग्णसंख्येत वाढ

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही सोमवारी 900च्या खाली आली होती. तर मंगळवारी सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 943 इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज नव्यानं भर पडलेल्या रुग्णांपैकी 126 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर 15 रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेत. तर 94 रुग्ण हे मंगळवारी कोरोनातून बरे झालेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा 97.61 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

चाचण्यांची संख्या वाढली

सोमवार आणि मंगळवारच्या 24 तासांत चाचण्यांची संख्या वाढल्यानं आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीतून दिसून आलंय. 5 हजार पेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच रुग्णवाढही लक्षणीय असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, सोमवारी चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे मृत्यूदराची चिंता वाढली होती. तर दुसरीकडे मंगळवारी एकाही कोरोना बळीची नोंद करण्यात आलेली नाही. आतापर्यंत राज्यात 3 हजार 164 कोरोना रुग्णांचा मृत्यू राज्यात झाला आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!