MONSOON UPDATE: ठरलेल्या वेळेत राज्यात मान्सूनचं होणार आगमन

1 जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता; गोवा हवामान खात्याचा अंदाज

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मान्सून गुरुवारी बंगालच्या उपसागराच्या (Bay of Bengal) दक्षिण पूर्वेकडील भागात पोचला असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे मान्सून 1 जूनपर्यंत केरळाता, तर 5 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता असल्याचं गोवा हवामान खात्याने वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात तौक्ते वादळाने धडक दिली. त्याकाळात राज्याच्या कानाकोपऱ्याला पावसाने झोडपून काढलं होतं. वादळाचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही. त्यातच मान्सून अंदमान बेटावर पोचला असून 1 जूनपर्यंत तो केरळात धडकेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

हेही वाचाः CURFEW | गोव्यात ७ जूनपर्यंत कर्फ्यू वाढवला

9 ते 10 जून दरम्यान कोकणात बसरणार सरी

यास चक्रीवादळाचा सकारात्मक परिणाम होऊन, मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मान्सून मालदीवमध्ये आहे. त्याची अशीच गती कायम राहिल्यास, वेळेत मान्सून पाऊस महाराष्ट्रात पडेल. सर्वसाधारणपणे 9 ते 10 जून दरम्यान हा पाऊस कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः आयपीएलचे उर्वरित सामने आता ‘यूएई’मध्ये होणार !

पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता

राज्यात 29, 30 आणि 31 मे असे तीन दिवस पावसाची शक्यता गोवा हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी वीज आणि गडगडाटासह पाऊस‌ पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!