MONSOON | गोव्यात 5 जूनपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता

गोवा हवामान खात्याची माहिती; पाऊस आणि वाऱ्याची स्थिती निकषांकडे न जुळल्यास 2 ते 3 दिवस होऊ शकतो उशीर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः केरळमध्ये गुरुवारी 3 जून रोजी मान्सून दाखल होत आहे. तर गोव्यात मान्सूनचं आगमन 5 जूनपूर्वी होण्याची शक्यता असल्याचं गोवा हवामान खात्याने म्हटलं आहे.

24 तासांत केरळात मान्सून होणार दाखल

उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेल्या फोटोंतून केरळच्या तटावर आणि त्याला लागून असलेल्या दक्षिण – पूर्व अरब सागरात ढग पसरलेले दिसून येत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासूनच दक्षिण – पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. केरळमध्ये यंदा मान्सून सामान्य परिस्थितीपेक्षा थोड्या उशिरानं दाखल होत असल्याचं, भारतीय हवामान विज्ञान विभागाचं म्हणणं आहे. दोन दिवस उशिरानं दाखल होत असला तरी आता येत्या काही तासांत केरळमध्ये रिमझिम पावसाला सुरूवात होऊ शकते.

2-3 दिवस होऊ शकतो उशीर

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये येत्या 24 तासांत स्थिती मान्सूनसाठी अधिक अनुकूल होण्याचा पूर्वानुमान आहे. केरळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडतोय. त्यामुळे राज्यात 5 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र पाऊस आणि वाऱ्याची स्थिती निकषांकडे न जुळल्यास मान्सूनच्या आगमनाच 2 ते 3 दिवस उशिरही होऊ शकतो, असं गोवा हवामान खात्याने म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!