आनंदवार्ता | मान्सूनचं आगमन, राज्यात ठिकठिकाणी रिमझिम सरी बरसायला सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः गुरुवारी दक्षिण-पश्चिम मान्सूनने दोन दिवसांच्या उशिराने केरळमध्ये हजेरी लावली. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झालं आहे. गोव्याच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी मान्सूनने गोव्यात प्रवेश केला आहे.
हेही वाचाः डिचोली तालुक्यात 140 शेतकऱ्यांचं नुकसान
गोव्यासह या भागात मान्सूनची हजेरी
मध्य अरबी समुद्र, कर्नाटकची संपूर्ण किनारपट्टी, गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर अंतर्गत कर्नाटकचा बहुतेक भाग, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा अधिक भाग, बंगालच्या मध्य उपसागराचा अधिक भाग आणि बंगालच्या ईशान्य उपसागराचा काही भागात शनिवारी 5 जून 2021 रोजी प्रवेश केला आहे.

पुढील 24 तासांत मान्सून सरकरणार पुढे
दरम्यान, हवामान विभीगाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा अधिक भाग, तेलंगणा, तामिळनाडूचा उर्वरित भाग, बंगालच्या मध्य आणि ईशान्य उपसागराचा अधिक भाग, उत्तर पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि ईशान्य भारतात जाण्याची शक्यता आहे.

जूनच्या मध्यापर्यंत निम्मा देश व्यापेल
जूनच्या मध्यापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग व्यापला जाईल. इतकंच नाहीतर हिमालयीय पश्चिम बंगालमध्येही मान्सूनचा पाऊस पडेल. जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशात हजेरी लावेल.

‘स्कायमेट वेदर’चा अंदाज
दरम्यान, येणारा पावसाळा सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज ‘स्कायमेट वेदर’ या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी स्कायमेटने मान्सूनच्या दीर्घकालीन अनुमानाविषयी ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये याविषयी माहिती दिली. सन 2021 मध्ये सरासरीच्या 103 टक्के (+/- 5 टक्के) पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सरासरीइतका पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.
हेही वाचाः WORLD ENVIRONMENT DAY| निसर्ग रक्षण ही काळाची गरज
या भागात कमी पावसाची शक्यता
येत्या पावसाळ्यामध्ये देशाच्या उत्तर भागात काही ठिकाणी, तसेच ईशान्येकडे काही भागांत कमी पावसाची शक्यता आहे. कोकणात सरासरीहून पाऊस कमी असू शकेल. कर्नाटकाच्या अंतर्भागांमध्येही जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडू शकेल, अशी शक्यता आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि सप्टेंबरमध्ये देशातून माघार घेत असताना संपूर्ण देशात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.