सत्तरीत नारळ उत्पादन घटण्यास माकड कारणीभूत

माकडांमुळे नारळ उत्पादन सुमारे ३० टक्क्यांनी घटलं; सत्तरी झेडएओ विश्वनाथ गावस यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः अलीकडच्या काळात सत्तरीमध्ये नारळाच्या उत्पादनात मोठी घट पहायला मिळतेय. याला कारणीभूत आहेत माकड. माकड अत्यंत धूर्त आणि जास्त उपद्रवी आहेत. त्यांनी नारळाच्या उत्पादनाची अक्षरशः वाट लावली आहे, ज्यामुळे त्यांचा समावेश उपद्रवी प्राण्यांमध्ये करण्याची मागणी या भागातून होतेय.

हेही वाचाः ‘एलडीसी’साठी लेखी परीक्षा आता होणार ‘या’ दिवशी

माकडाला उपद्रवी प्राणी घोषित करा

 गेल्या दहा वर्षापासून सत्तरी तालुक्यातील रानटी जनावरांचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यावा अशा प्रकारची मागणी वारंवार करण्यात येत होती. शेवटी गोवा राज्याचे मुख्यमंत्री तथा वनमंत्री प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात गांभीर्याने विचार करून रानटी जनावरांपैकी रानडुक्कर हा उपद्रवी प्राणी घोषित करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशाचं सत्तरी तालुक्यातून स्वागत करण्यात येतंय. मात्र रानडुकरांबरोबरच सरकाराने माकडाला  उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करावं अशी मागणी सत्तरी तालुक्यातील शेतकरी आणि कृषी उत्पादकांनी केली आहे. नारळ उत्पादन घटण्यामागे माकड कारणीभूत असल्याने अशी मागणी सत्तरीवासीयांकडून करण्यात येतेय.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं पॅकेज हे भाजपचं इलेक्शन रिव्हायव्हल पॅकेज

माकड, रानडुकर, गवेरेडे, शेकरू उठलेत शेतकऱ्यांच्या जिवावर

सत्तरीतील अनेक शेतकरी आणि कृषी उत्पादकांनी सांगितलं, की रानडुकरापेक्षा माकड पिकांचं आणि लागवडीचे खूप जास्त नुकसान करतात. सत्तरी तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून रानटी जनावरांचा उपद्रव प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेण्यास घाबरतात. माकड, रानडुकर, गवेरेडे, शेकरू हे प्राणी प्रामुख्याने शेतकरी बांधवांच्या जीवावर उठलेत. यामुळे सत्तरी तालुक्यातील अनेक जमिनी आजही रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे पडीक ठेवण्यात आल्यात. या रानटी जनावरांपैकी माकड रानडुक्कर आणि गवेरेडे हे रानटी प्राणी अत्यंत धोकादायक असून यामुळे शेतकरी बांधवांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय, असं हेदोडे-सत्तरी येथील अशोक जोशी म्हणाले. काही रानटी प्राण्यांना उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यासाठी जोशींनी सक्रिय भूमिका बजावली आहे. 

तरच सत्तरीच चांगले दिवस दिसतील

गव्यारेड्यांसोबतच सरकारने माकडांनाही उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करावं. कारण सत्तरी भागात नारळ उत्पादन घटण्यामागे माकडच अधिक कारणीभूत आहेत, असं कोपार्डे सत्तरी येथील रामा सावंत माकडांवर दोषारोप करताना म्हणाले. घटणारं नारळ उत्पादन जर नियंत्रणात आणायचं असेल, तर माकडांना उपद्रवी प्राणी म्हणून घोषित केल्याशिवाय ते शक्य नाही. माकडांना उपद्रवी प्राणी म्हणून घोषित केल्यास नारळ उत्पादनात सत्तरीत चांगले दिवस दिसतील, असं सावंत म्हणाले.

हेही वाचाः ‘आप’कडून संगीत चित्रफितीचे प्रकाशन

सत्तरीत नारळ उत्पादन 30 टक्क्यांनी घटलं

सत्तरी तालुक्यातील नारळ उत्पादनावर माकडांमुळे मोठा परिणाम झालाय. माकडांमुळे सत्तरी तालुक्यातील नारळाचं उत्पादन सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज आहे, असं सत्तरीचे विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Video | Breaking | कोलवामध्ये पुन्हा एकदा रस्ता खचल्यानं आश्चर्य

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!