कुंकळ्ळीसाठी सोमवार ठरला घातवार

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगाव : दक्षिण गोव्यात कुंकळ्ळी पोलीस स्थानकाच्या हद्दीत सोमवारी एकाच दिवशी तीन अपघातांची नोंद झाली असून यात ४ दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय एकजण गंभीर जखमी झाला आहे.
कुंकळ्ळीसाठी सोमवार हा घातवार
कुंकळ्ळीसाठी सोमवार हा घातवार ठरला आहे. यात दांडेवाडी ते गुडी रोडकडे जात असताना सार्झोरा येथील होली क्रॉस चॅपेलजवळ दुचाकीचा स्वयंअपघात झाला. या अपघातात सर्फराज बेपारी व नझील बेपारी या चुलत भावांचा मृत्यू झाला. तर चिंचणीहून असोळणाच्या दिशेने जाताना दुचाकीची सायकलला धडक बसली. यात दुचाकीचालक सायरस परेरा (१९, रा. दुर्गा, चिंचणी) याचा मृत्यू झाला. तर सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे.
हेही वाचाः दवर्लीतीलच नव्हे, सर्वच बेकायदा घरे पाडा!
कार व दोन दुचाकी यांच्यात अपघात
रात्री ८ वाजता कुंकळ्ळी कदंब बसस्थानकाजवळ रात्री ८ वाजता कार व दोन दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. कुंकळ्ळीकडून मडगावकडे जाणार्या झेन कारने विरुद्ध दिशेने येणार्या स्प्लेंडर व यामाहा या दोन दुचाकींना धडक दिली. अपघातग्रस्त यामाहा दुचाकी गोव्यातील तर स्प्लेंडर कर्नाटक येथील आहे. यामाहाच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच स्प्लेंडर चालकावर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.