मोहन जोशींना कोरोनाची लागण, गोव्यात क्वारंटाईन

कोरोना लसीचे २ डोस घेऊनही झाले कोरोना पॉझिटिव्ह

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अनेक कलाकारांना देखील कोरोनाचा विळखा घातला आहे. मराठी अभिनेते मोहन जोशी यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे स्वतः सोशल मीडियावर सांगीतलं. विशेष म्हणजे मोहन जोशी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आणि त्यानंतर आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचाः स्वॅब टेस्ट न करताच दिला कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट !

गोव्यात शुटिंगदरम्यान झाली कोरोनाची लागण

मोहन जोशी सध्या ‘अग्गंबाई सुनबाई’ या मालिकेत काम करत आहेत. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मालिकांचं शूटींग बंद करण्यात आलं. त्यानंतर या मालिकेचं शूटींग गोव्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोहन जोशी यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम गोव्यात होती. त्याचवेळी मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली.

हेही वाचाः Be Positive | Home Isolationमध्ये नव्यानं भर पडलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त!

मोहन जोशी गोव्यात क्वारंटाईन

मोहन जोशी यांना कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. सध्या मोहन जोशी गोव्यामध्ये क्वारंटाईन असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र गोव्यातही सध्या लॉकडाऊन लागलं असून मालिकेचं शूटींग बंद आहे.

हेही वाचाः टीकेला भीत नाही, सरकार 100 टक्के कार्यरत

अभिनयाची छाप

मोहन जोशी यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसह तामिळ, तेलुगु, कन्नड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!