‘या’ सरकारी बाबुंचं ‘हनिमुन’ संपवणार मोदी सरकार !

अंडर परफॉर्मन्स-50 अधिकारी वर्गाचा होणार 'रिव्यू'

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सरकार कोणाचंही असो, योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करणं आणि त्या लोकप्रिय करणं, हे सर्वस्वी अधिकारी वर्गावर अवलंबुन असतं. त्यामुळंच की काय, सरकारी योजनांचं अपयश आणि काही वेळा घोटाळाही अशा सरकारी अधिकारी वर्गाच्या माथी मारला जातो. अर्थात अनेक अधिकारी याला अपवाद असतात. आता पंतप्रधान मोदी यांच्या सरकारनं मात्र अंडर परफॉर्मन्स-50 असणा-या अशा सरकारी बाबुंचा रीव्यू करण्याचं ठरवलंय. त्यामुळं सरकारी नोकरी म्हणून काम न करता केवळ टाईमपास करणा-या अधिका-यांना जबरदस्तीनं घरी घालवलं जाण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसातील सरकारची वाटचाल पाहता, विकासाची प्रक्रीया अधिक गतीमान करण्यासाठी मोदी सरकार हे पाऊल उचलणार आहे. यात 50 वर्षांपुढील कर्मचारी वर्गाचा रिव्यू होणार आहे. यात अंडरपरफॉर्मन्स कर्मचा-यांना जबरदस्ती घरी घालवण्याचा देखील सरकारचा विचार आहे.

अशा प्रकारची कार्यवाही ऑगस्ट 2020 मध्ये सुरू झाली होती. यात सरळ सरळ अशीच विचारणा करण्यात आली होती की, कार्यक्षमता नसणा-या अधिका-यांनी काम चालु ठेवायला हवं की जनतेच्या हितासाठी थांबायला हवं. यासाठी एक फॉर्मही तयार करण्यात आला होता. तो भरून घेतला जात होता. यापूर्वी अशाच प्रकारे प्राप्तीकर विभागाच्या अकार्यक्षम अधिका-यांनाही घरी घालवण्यात आलं होतं. आता सर्वच सरकारी खात्यांना हा फॉर्म पाठवण्यात आला आहे. त्यातला एकही कॉलम रिकामा न ठेवता तो भरण्याच्या कठोर सुचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळं अनेक कामचुकार सरकारी अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!