पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवून मोदी सरकारने लुटले २२ लाख ७० हजार कोटी

गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकरांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: जे पेट्रोल ३५.६३ रुपयांना मिळतं ते तब्बल ९३.८० रुपयांना आणि ३८.१६ रुपयांना मिळणारं डिझेल ९१.५० रुपयांना विकत घ्यायला लावून केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला फसवणूक आणि लूट करत आहे, अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शुक्रवारी केली. केंद्राच्या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्यावतीने राज्यभरातील विविध पेट्रोल पंपावर लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राजधानीतील नेवगी नगर येथील पेट्रोल पंपावर करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये ते बोलत होते.

हेही वाचाः पेडण्यातील शेतकऱ्यांना प्रवीण आर्लेकरकडून मदतीचा हात

काँग्रेस नेत्यांकडून इंधन दरवाढीचा निषेध

यावेळी सांताक्रूझ विभागाचे नेते रुडॉल्फ फर्नाडिस, विभाग अध्यक्ष सुशांत गोवेकर, युवा काँग्रेस विभाग अध्यक्ष क्लीबन जुड फर्नाडिस, प्रकाश साळकर, महादेव माडा (सेवादल प्रमुख, सांताक्रूझ), आर्शिया इनामदार, व्हिटोरीन फर्नाडिस यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी इंधन दरवाढीचा प्रतीकात्मक निषेध म्हणून गिरीश चोडणकर यांच्यासह काहींनी ‘सुटबुट’ घालून बैलगाडीतून प्रवास केला. 

हेही वाचाः घृणास्पद । अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

‘अच्छे दिन’च्या नावाखाली इंधन दरवाढ

कोविड काळामध्ये जनतेला धीर देण्याऐवजी ‘अच्छे दिन’च्या नावाखाली इंधन दरवाढ करून मोदी सरकार जनतेची लुबाडणूक करत आहे. अवघ्या ३५.६३ रुपये प्रति लिटर मिळणाऱ्या पेट्रोलवर आणि ३८.१६  रुपयांच्या डिझेलवर मोदी सरकार फ्रेट, कस्टम ड्युटी, बेसिक एक्साईज, स्पेशल ड्यूटी, कृषी पायाभूत सुविधा उपकर (एआयडीसी), रस्ता आणि पायाभूत सुविधा उपकर आकारत आहे. यामुळे यांच्या किमती अनुक्रमे ९३.८० आणि ९१.५० रुपये इतकी होते.  आणि ही सरळसरळ लूट आहे, अशी टिप्पणी चोडणकरांनी यावेळी केली. 

हेही वाचाः आता जेटीचं पणजीत स्थलांतर

सरकारने २२ लाख ७० हजार कोटी रुपये जनतेकडून लाटले

२०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारने रु. २२ लाख ७० हजार कोटी रुपये (२२,६९, १२२ कोटी) तर राज्य सरकारने १३ लाख ११ हजार २०० कोटी (१३,११,२००  कोटी) रुपये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीं वाढवत जनतेकडून लाटलंय, असं ते पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ३६ आणि ३८ रुपये प्रति लिटर विकण्याची आग्रही मागणी केली. 

हेही वाचाः ACCIDENT | कुठ्ठाळी अपघातात एक महिला ठार

सरकारने देशातील जनतेचंदेखील कंबरडं मोडलं

रुडॉल्फ फर्नांडिस यांनी यावेळी मोदी सरकारला ‘क्रूर’ असं संबोधत, या सरकारने भारतीय रुपया मजबूत करण्याची स्वप्ने दाखवत सत्ता मिळवली. मात्र त्यांनी तर उलट रुपयाला कमकुवत तर केलंच, वर देशातील जनतेचंदेखील कंबरडं मोडलं. हे सगळे थांबवून या सरकारने त्वरित देशातील इंधन दरवाढ कमी करावी, अशी मागणी केली. 

हेही वाचाः न्यायालयीन कामकाजात 15 जून पासून बदल

जनतेच्या दुःखावर फुंकर घालावी

 कोविड काळातही अत्यंत असंवेदशील वागणाऱ्या मोदी सरकारने आता तरी थोडी माणुसकी दाखवावी आणि देशातील इंधन दरवाढ कमी करून जनतेच्या दुःखावर फुंकर घालावी, अशी आग्रही मागणी सांताक्रूझ विभाग अध्यक्ष सुशांत गोवेकरांनी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!