गोव्यात मोबाईल नेटवर्कची क्षमता वाढवण्यासंबंधी मोठा निर्णय

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवा टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी २०२० अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी महतत्वाची घोषणा केली आहे. पहिल्या फेजमधील प्रस्तावित ६२ मोबाईल टॉवर्सनंतर आता दुसऱ्या फेजमध्ये लवकरच १३८ मोबाईल टॉवर्स गोव्यात उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील नेटवर्कमध्ये सुधार दिसून येईल. तसंच विद्यार्थी, आयटी प्रोफेशनल्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्टार्टअप करणाऱ्यांना याचा लाभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. फेसबूक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यातील अनेक ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या उद्भवते. तसंच कोरोना महामारीत शिक्षण ऑनलाईन केल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागत असल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, आता मोबाईल टॉवर्सच्या संख्येत वाढ केल्यानं नेटवर्कची समस्या लवकरच दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

नेमकं मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय?

मला सांगायला आनंद होतोय की, पहिल्या टप्प्यात गोवा टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी २०२० च्या अंतर्गत आमच्या सरकारने 62 ठिकाणी मोबाइल टॉवर्स उभारण्याचे प्रस्तावित केले आहे आणि दुसर्‍या टप्प्यात गोव्यामध्ये आणखी १ 138 मोबाइल टॉवर्स लवकरच प्रस्तावित केले जाणार आहेत. यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. तसंच विद्यार्थी, आयटी व्यावसायिक, टेक स्टार्टअप्स इत्यादी समाजातील सर्व घटकांना त्याचा फायदा होईल.

मुख्यमंत्र्यांची फेसबुक पोस्ट –

Glad to announce that our Government under the Goa Telecom Infrastructure Policy 2020 in the 1st phase has proposed…

Posted by Dr. Pramod Sawant on Friday, 1 January 2021
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!