भांडारकरांची गोव्यात ‘मधुर’ सुरुवात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण…

फिल्ममेकर मधुर भांडारकरांनी घेतली मुख्ममंत्र्यांची भेट

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : सिनेदिग्दर्शक मधुर भांडरकर (Madhur Bhandarkar) गोव्यात आले होते. गोव्यात येऊन त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्ममंत्र्यांसोबत सविस्तर बातचीत केली. गोव्यात अनेक सिनेमांचं चित्रकरण सुरु असतं. लवकरच मधुर भांडारकर गोव्यात (Goa) आपल्या नव्या सिनेमाचं शुटिंग सुरु करणार असल्याची चर्चा या भेटीच्या निमित्तानं रंगली आहे.

सिनेकलाकारांना गोव्याचं आकर्षण

मधुर भांडारकर यांच्या भेटीदरम्यानचा फोटो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी शेअर केला आहे. त्यांच्या सोबत झालेल्या भेटीत चांगली चर्चा झाल्याचंही मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. मधुर भांडारकर हे गेल्या काही दिवसांपासून गोव्यात आहेत. गोवा हे सिने-दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना नेहमीच आकर्षित करत आलं आहे. अनेक सिनेमांचं गोव्याच चित्रीकरण झालं आहे. सरकारही कलाकारांना गोव्यात सिनेमांच्या चित्रीकरणासाठी सकारात्मक भूमिका बजावण्यासाठी कटीबद्ध आहे, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

गोव्यात भांडारकरांचा नवा प्रोजेक्ट?

ट्रॅफिक सिग्नल (Traffic Signal) या सिनेमासाठी केलेल्या लेखन आणि दिग्दर्शनासाठी मधुर भांडारकर यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 2016 साली त्यांचा पद्मश्री पुरस्कारानेही गौरव करण्यात आला होता. आशयगहन आणि चौकटीच्या बाहेरचे विषय हाताळणाऱ्या मधुर भांडारकरांच्या सिनेमाचा एक विशिष्ट चाहतावर्ग आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतर आता गोव्यात मधुर भांडारकर नवं काय करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मधुर भांडारकरांनी दिग्दर्शित केलेले काही खास सिनेमे

सत्ता
चांदनी चोर
फॅशन
दिल तो बच्चा है जी
हिरोईन
पेज थ्री
चांदनी बार

Had a good meeting with Filmmaker Madhur Bhandarkar. Goa is one of the favourite destination for filmmakers and our Government looks to create a cordial environment for filmmaking in the state.

Posted by Dr. Pramod Sawant on Monday, 5 October 2020
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!