बेपत्ता रुद्रेश सापडला; आईवडिलांनी मानले पोलिसांचे आभार

खारेपाटण येथे सापडला; 5 दिवसांपूर्वी झाला होता बेपत्ता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः म्हापसा इथून 5 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला रुद्रेश पिळर्णकर (वय वर्षं, 24) अखेर सापडला असल्याची माहिती समोर येतेय. रुद्रेशला खारेपाटण इथून कोविड ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय. रुद्रेश सुखरुप साडल्यानं त्याच्या आईवडिलांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

हेही वाचाः ऑनलाईन शिक्षणामुळे मानसिक, बौद्धिक, भावनिक विकासाला खीळ

कसा सापडला?

5 दिवसांपूर्वी रुद्रेश म्हापशातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी पोलिसांची मदत घेतली. त्याचबरोबर सोशल मीडियावर तो बेपत्ता झाला असल्याची माहिती दिली. हा मेसेज बघता बघता प्रचंड वायरल झाला. पावशी कुडाळ येथील योगेश अशोक हेरेकर हे खारेपाटण टाकेवाडी इथून जात असताना त्यांना एक मुलगा रस्त्याच्या कडेला दिसला, जो रुद्रेशच्या आईवडिलांनी सोशल मीडियावर वायरल केलेल्या फोटोमधील मुलासारखा होता. त्यामुळे तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांना याविषयी त्यांनी कल्पना दिली. त्यानंतर वाहतूक पोलीस अंमलदार प्रकाश गवस, उद्धव साबळे, सुयोग पोकळे यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन रुद्रेशला ताब्यात घेतलं आणि त्याच्या वडिलांना कळवलं.

रुद्रेशच्या काळजीने आईवडील चिंतीत

रुद्रेश हा हल्लीच इटलीतून शिकून परतला होता. रुद्रेश गायब झाल्यापासून त्याचा मोबाईलही बंद येत होता. त्यामुळे त्याचे आईवडिल प्रचंड टेंशनमध्ये आले होते. गेल्या काही दिवसांपासून समोर येत असलेल्या घटनांनी रुद्रेशच्या कुटुंबीयांची काळजीही वाढली होती.

हेही वाचाः भाजपविरोधी आघाडीच्या काँग्रेसकडून हालचाली!

अनेक अनुत्तरित प्रश्न

दरम्यान रुद्रेश कशासाठी घर सोडून गेला? दोन दिवस कुठे राहिला? कसे काढले दोन दिवस? खारेपाटणला कसा पोहोचला? तो कुठे जाण्यासाठी निघाला होता? असे अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरित आहेत. याविषयी अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.

हा व्हिडिओ पहाः POLITICS | SPECIAL REPORT | बाणावलीत नेत्यांची धुमश्चक्री आणि मतदारांची कोंडी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!