लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभाविषयीच्या ‘त्या’ बातम्या दिशाभूल करणाऱ्या

महिला व बाल विकास संचालनालयाचं स्पष्टीकरण; पात्र असलेल्या प्रत्येक अर्जदारास योजनेंतर्गत लाभ मिळणार असल्याची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः महिला व बाल विकास संचालनालयाने लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाच्या वितरणावरून काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी पूर्णपणे चुकीची असून गोवा राज्यातील जनतेची दिशाभूल करणारी आणि राज्य सरकारची प्रतिमा मलीन करणारी असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचाः आप आणि मगो एकत्र येण्याच्या ‘या’ 3 शक्यता काय सूचित करतात?

जून महिन्यात लाडली लक्ष्मी योजनेचे ३७४९ अर्ज मंजूर

नोडल बँक (एचडीएफसी, स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये ३७ कोटी आणि ४९ लाख रुपये जमा केल्यानंतर महिला आणि बाल विकास खात्याने जून महिन्यात लाडली लक्ष्मी योजनेचे ३७४९ अर्ज मंजूर केल्याची माहिती दिली. ५ जुलै २०२१ पासून मूळ कागदपत्रे बँकेत सादर केल्या गेलेल्या लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची पावती आधीच मिळाली आहे.

हेही वाचाः काँग्रेसचं लक्ष्य 2024 : राहुल, प्रियांका, प्रशांत किशोर यांच्यात चर्चा !

…आणि मगत रक्कम लाभार्थी बँक खात्यात जमा केली जाते

योजनेंतर्गत सुलभ वितरणासाठी आणि मोठी गर्दी टाळण्यासाठी सदर खात्याने दररोज टोकन क्रमांक देणं सुरू केलं आहे आणि त्यानुसार लाभार्थ्यांना वितरण प्रक्रियेसाठी विशिष्ट तारखेला बोलावण्यात आलं आहे. वितरणाच्या दिवशी लाडली लक्ष्मी योजनेची मूळ कागदपत्रे लाभार्थ्यांना दिली जातात, जी लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित बँकेत सादर करावी लागतात. एकदा मूळ कागदपत्रे लाभार्थीच्या संबंधित बँकेत जमा झाल्यावर ही रक्कम लाभार्थी बँक खात्यात जमा केली जाते.

हेही वाचाः Tiger captured | सुर्ल भागात पट्टेरी वाघाच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद

गृह आधार योजनेंतर्गत ६ जुलै २०२१ रोजी एचडीएफसी बँकेत ‘एवढे’ पैसे जमा

याशिवाय गृह आधार योजनेंतर्गत ६ जुलै २०२१ रोजी रू. १८, ०८, ०८,५०० एचडीएफसी बँकेत जमा केले आहेत आणि वितरण प्रक्रिया चालू आहे. फ्रेश प्रकरणांसाठी मामलेदारांचा उत्पन्न दाखला सादर करण्याची गरज नाही. संशयास्पद प्रकरणांसाठी मामलेदारांचा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. या संशयास्पद अर्जांची यादी संबंधित तालुका मामलेदारांकडे अगोदरच उपलब्ध आहे.

हेही वाचाः काणकोण नगरपालिकेच्या नवीन इमारत बांधकामास राज्य सरकारची मंजूरी

सदर खात्याने अर्जदारांना घाबरू नका असं आवाहन केलं आहे आणि पात्र असलेल्या प्रत्येक अर्जदारास योजनेंतर्गत लाभ मिळणार अशी माहिती दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!