खनिजवाहू बार्ज बुडाली! एकाचा मृत्यू, ७ जणांना वाचवलं

समुद्रात उलटलेल्या स्थितीतील ‘एमव्ही सूर्या’ जहाज.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मुरगाव बंदरात एमपीटीपासून जवळच खनिजवाहू बार्ज समुद्रात बुडाल्याने खळबळ माजली आहे. ही दुर्घटना सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली असून या अपघातात बार्जवरील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर सात जणांना वाचवण्यात यश आलंय.

‘एमव्ही मॅरीलिसा’ बोटीतून ‘एमव्ही सूर्या’ बार्जमध्ये खनिज माल उतरवला जात असताना ‘एमव्ही सूर्या’ जहाज बुडाले. या बार्जवर आठ कर्मचारी होते. आठही कामगारांना बाहेर काढण्यात आले होते. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना चिखलीतील इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पण त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.

हेही वाचा – Crime | नवऱ्यानं बायकोचा हातच कापला! नवरा बायकोच्या भांडणांनी ‘या’ राज्यात गाठला कहर

मुरगाव बंदरात एमपीटीपासून जवळच हे खनिजवाहून बार्ज होती. ही बार्ज बुडणार असल्याचं लक्षात येताच तात्काळ या जहाजावरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आलं. या बार्जवर एकूण ८ कर्मचारी होते. सर्वच्या सर्व आठ कर्मचाऱ्यांना बार्जवरुन वाचवण्यात आलं. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक झाली होती. दरम्यान, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसऱ्यावर अजूननही उपचार सुरु आहेत.

हेही वाचा – धक्कादायक! मंगळुरूहून गोव्यात परतत होते, पण वाटेतच मृत्यूनं गाठलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!