भाजपमध्ये अल्पसंख्याक मुख्यमंत्रीही शक्य

भाजपचे राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे महासचिव तथा आमदार जोशुआ डिसोझा यांनी व्यक्त केला विश्वास

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: भाजपमधील अल्पसंख्याक समाजाच्या आमदारांची संख्या एकवरून १५ वर पोहोचली आहे. पक्षाला यासाठी १५ वर्षं मेहनत घ्यावी लागली. आगामी निवडणुकीत या समाजातून निवडून येणार्‍या आमदारांची संख्या समाधानकारक असल्यास या समाजाला भाजपमधून मुख्यमंत्रिपद भूषविण्याची संधीही मिळू शकेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे महासचिव तथा आमदार जोशुआ डिसोझा यांनी व्यक्त केला.

हेही वाचाः नागरी सेवेतील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या

हळदोणात पक्ष कार्यालयात कार्यक्रम

हळदोणातील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार जोशुआ बोलत होते. यावेळी आमदार ग्लेन टिकलो, उत्तर गोवा उपाध्यक्ष फ्रेन्की कार्व्हालो व फ्रेडी फर्नांडिस उपस्थित होते.

अल्पसंख्याक समाजातील मतदारांना या पक्षाकडे आकर्षित करण्याचं कार्य कठीण होतं

अल्पसंख्याक समाजातील मतदारांना या पक्षाकडे आकर्षित करण्याचं कार्य कठीण होतं. अनेक मतदारसंघात समित्या स्थापन होत नव्हत्या. आता या समाजातील मतदारांना या पक्षाचं महत्त्व, पक्षाचं कार्य, पक्षाने केलेला विकास समजला आहे, असं जोशुआ यावेळी म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Politics | Exclusive | काँग्रेस उमेदवारीसाठी उदय आणि टोनी इच्छुक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!