महामार्ग विषयक ज्येष्ठांची समस्येची मंत्री नितीन गडकरींकडून दखल

बांबोळी येथील महामार्ग‍ रुंदीकरणामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होणार नाही यावर उपाययोजना करण्याचे आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: विविध खात्यांच्या पायऱ्या झिजवल्यानंतर बांबोळी येथील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. बांबोळी येथील महामार्ग‍ रुंदीकरणामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होणार नाही, यावर उपाययोजना करण्याचे आदेश केंद्रीय मंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाची कामे सुरू असल्यानं बऱ्याच लोकांची गैरसोय

गोव्यात सर्वत्र राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांची गैरसोय होत आहे. बांबोळी येथे पालमार कॉलनीत रहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे सांताक्रुज-बांबोळी रस्त्याची ८ मीटर असलेली रुंदी ४.५ मीटर केली आहे. केवळ एका मनुष्याचे हित जपण्यासाठी हा सर्व खटाटोप होत असल्याचा आरोप येथील ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना करून समस्या सोडवावी

पलमार कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांची समस्या सुटावी यासाठी सदर नागरिकांनी साबांखा तसेच संबंधित यंत्रणांना अनेकदा निवेदने दिली. तरीही यावर काहीच पावले उचलली जात नाहीत. साबांखा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना करावी आणि समस्या सोडवावी, असे इमेल केंद्रीय रस्ता आणि महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव संकेत भोंडवे यांनी केले आहे. या कार्यवाहीचा अहवाल मंत्रालयाला सादर करावा, असे आवाहन साबांखा तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांनी या समस्येची तक्रार मानवाधिकार आयोगासह मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही पाठविली आहे.

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे सध्याचे काम हे बेकायदा

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे सध्याचे काम हे मूळ आराखड्यापेक्षा वेगळे असून ते बेकायदा आहे. कंत्राटदार आणि सल्लागाराने सांताक्रुज-बांबोळी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. सदर कॉलनीत रहाणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, असे निवेदन ज्येष्ठ नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर केले आहे. तसंच हा महामार्ग १२ ते १५ मीटर खोल खणण्यात आल्यामुळे सदर रस्ता धोकादायक झाला आहे, असंही निवेदनात नमूद केले आहे.

हा व्हिडिओ पहाः POLICE| पोलिस खात्याच्या भरतीला प्रचंड प्रतिसाद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!