खाणींसंबंधी नजिकच्या काळात ‘गुड न्यूज’!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी सकारात्मक चर्चा.

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेउन खाण व्यवसायासह गोव्याशी निगडित विविध विषयांवर चर्चा केली. खाणींसंबंधी नजिकच्या काळात सुवार्ता कळेल, अशा आशयाचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांच्याशीही मुख्यमंत्री सावंत यांनी चर्चा केली. गोव्यातील खनिजमालाची वाहतूक व खाण व्यवसायासंबंधी येत असलेले अडथळे याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून लवकरच खाणींबाबत आनंददायक बातमी कळेल, अशी आशा मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!