डॉक्टर तिळवे माराहाण प्रकरणी मिनेष नार्वेकरला सशर्त जामीन मंजूर

जेएमएफसी कोर्टाकडून १० हजरांच्या हमीवर सशर्त जामीन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : नवजात चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी करण्यात आलेल्या डॉक्टर मारहाणप्रकरणी महत्त्वाची अपडेट हाती येतेय. या प्रकरणातील संशयित आरोपी मिनेष नार्वेकरला म्हापसा जेएमएफसी कोर्टाकडून १० हजरांच्या हमीवर सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय. मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी संशयित आरोपी मिनेष नार्वेकर पर्वरी पोलिसांना शरण आला होता. दरम्यान या प्रकरणातील इतर दोन संशयित रोहिल साळगावकर आणि रोहिश साळगावकर यांना यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पोलिसांना शरण जाण्याआधी माध्यमांकडे मांडली होती आपली भूमिका

संशयित आरोपी मिनेश नार्वेकर मंगळवारी पोलिसांना शरण जाण्याअगोदर त्यानं माध्यमांकडे आपली भूमिका मांडत डॉक्टर तिळवे यांच्यावर सनसनाटी आरोप केले होते. तर दुसरीकडे डॉक्टर तिळवे यांचाही एक व्हिडीओ समोर आला होता, जिथे डॉक्टर व्हिडिओमध्ये जीवे मारण्याची धमकी देत असल्याचंही कैद झालं होतं. या सर्व प्रकरणावरुन राज्यात चित्रविचित्र प्रतिक्रियादेखील उमटताना पाहायला मिळत आहेत.

डॉक्टरांच्या दबावानंतर अटकेची कारवाई?

डॉक्टर मारहाण प्रकरणी पोलिसांनी रोहिश साळगावकर, कृष्णा नाईक, रोहील साळगावकर यांना सोमवारी अटक केली होती. हे सर्वजण पर्वरीतील रहिवासी आहेत. सोमवारी भारतीय वैद्यकीय मंडळाच्या डॉक्टरांनी मोर्चा काढून डॉक्टर अमोल तिळवे यांना मारहाण करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, असा इशारा पोलिसांना दिला होता. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. मात्र सोमवारी मुख्य संशयिताला अटक करण्यात आली नव्हती.

हेही वाचाः प्रो. ‌हरिलाल मेनन गोवा विद्यापीठाचे नवे ‌कुलगुरु

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी जीएमसीत एका नवजात बाळाचा मृत्यू झाला. या बाळावर सुरुवातीला जेएमजे या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर या बाळाला जीएमसी नेण्यात आलं. मात्र तिथे या बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर पर्वरीतील रुग्णालयात काम करणारे डॉ. अमोल तिळवे यांना या बाळाच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार नातलगांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पर्वीरीतील पीडीए कॉलनीत राहणारे मिनेष नार्वेकर यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

हेही वाचाः सध्याच्या आमदारांना बदलणं, हाच वास्कोतल्या समस्यांवर पर्याय !

पर्वरीतील पीडीए कॉलनीमधील मिनेष नार्वेकर याने आपल्या बहिणीच्या बाळाला जेएमजे रुग्णालयात उपचासाठी दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याच्या बहिणीच्या नवजात बाळाच्या मृत्यू झाला. या मृत्यूबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अमोल तिळवे यांना जबाबदार धरत त्यांना मिनेश यांनं मारहाण केली. नवजात बाळाला दुर्मिळ आजार होता. त्याला वाचवण्याचे डॉक्टरांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु होता. मात्र नेमक्या आजाराचं निदान करणं कठीण झालं होतं. म्हणून बाळाला बांबोळीतील जीएमसीत पाठवण्यात आलं होतं. मात्र नंतर बाळाचा मृत्यू झाला.

बाळाच्या मृत्यूसाठी मिनेष नार्वेकर याने डॉ. तिळवे यांना जबाबदार धरलं. डॉ. तिळवेंच्या चुकीमुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याच्या आरोप करण्यात आला. इतकंच नाही तर, डॉ. तिळवे यांनी बाळाच्या उपचारादरम्यान निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत मिनेष नार्वेकर यांने डॉ. तिळवे यांना त्यांच्या क्लिनिकमध्ये घुसून मारहाण केली, अशीही माहिती समोर आली. या प्रकारानंतर डॉ. तिळवेंनी पर्वरी पोलिसात मिनेष नार्वेकर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

हा व्हिडिओ पहाः VIOLENCE AGAINST WOMEN | महिन्याकाठी महिलांवरील अत्याचाराच्या 20 घटना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!