माझी पत्नी आगामी निवडणुक लढवण्यास इच्छुकः मायकल लोबो

साळगाव वा शिवोली मतदारसंघातून तिकीटासाठी लोबोंचा पक्षाकडे दावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: माझी पत्नी डेलीला लोबो साळगाव वा शिवोली मतदारसंघातून आगामी निवडणुका लढवण्यास इच्छुक आहे, असं बंदर कप्तान मंत्री मायकल लोबोंनी बुधवारी सांगितलं. योग्य वेळ येताच मी पक्षाकडे तिकिटासाठी दावा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचाः CORONA UPDATE | राज्याचा रिकव्हरी रेट वाढला

पर्यटकांसाठी गोवा लवकरच खुला करणार

पर्यटन हळूहळू सुरू होत आहे आणि गोव्यामध्ये पर्यटकांना योग्य ‘स्क्रीनिंग’ आणि ‘आरटी-पीसीआर’चं निगेटिव्ह सर्टिफिकेट असणं आवश्यक करण्यात आलं आहे. आम्हाला जुलैपर्यंत थांबावं लागेल आणि कोविडबाधिकांची संख्या शून्यावर येण्याची वाट पहावी लागेल. आम्ही योग्य तपासणी करुन गोवा पुन्हा पर्यटकांसाठी खुला करू. राज्यातील पर्यटन पुन्हा सुरू केल्यावर पहिल्या तीन महिन्यांसाठी पर्यटकांना लसींचे दोन्ही डोस आणि ‘आरटी-पीसीआर’ अहवाल अनिवार्य केले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचाः पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक, दुप्पट मिळेल फायदा

वर्षाच्या अखेर कोविड नियमावलीत बदल शक्य

पर्यटनच्या हंगामात नियमावलीत काही बदल करावे लागतील. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नियम बदलतील. त्यामुळे नवीन वर्षं किंवा ख्रिसमससाठी राज्यात येणार्‍या पर्यटकांवर त्याचा परिणाम होणार नाही, असंही लोबोंनी सांगितलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!