म्हापसा पोलिसांकडून चोरी प्रकरणी एकास अटक

अर्जून हिरालाल पवार याला घेतलं ताब्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः सध्या शहरात चोरांचा सुळसुळाट झालाय. रोज चोरीच्या घटना समोर येत आहेत. एका बाजूने मुख्यमंत्री गुन्ह्यांवर आळा घालणार असल्याचं आपल्या भाषणांमधून सांगतायत, तर दुसऱ्या बाजूने गुन्ह्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. या सगळ्यात गोवा पोलिसांनी मात्र कंबर कसली आहे. चोरांना जेरबंद करण्यासाठी गोवा पोलिसांकडून उत्तम कामगिरी बजावली जातेय. म्हापसा पोलिसांनी अशीच कामगिरी बजावत एका चोराच्या मुसक्या आवळल्यात.

हेही वाचाः सरकार 200 ते 250 पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करणार

काय चोरलं?

म्हापसा पोलिसांनी शुक्रवारी थिवीतून एका चोराला ताब्यात घेतलंय. या चोरावर पर्वरीतून दुचाकी चोरल्याचा आरोप असून पोलिसांना त्याला जेरबंद करण्यात यश आलंय. संशयित पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करत चालला होता. मात्र पोलिसांनी त्याच्या योजनेवर पाणी फेरत त्याला ताब्यात घेतलंय.

हेही वाचाः हे सुद्धा दिवस निघून जातील

माडेल-थिवीतून चोराला अटक

दुचाकी चोरी प्रकरणा म्हापसा पोलिसांनी अर्जून हिरालाल पवार या 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलंय. संशयित थिवी येथील रहिवासी असून त्याने पर्वरी इथून दुचाकी चोरली होती. दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत नोंद झाल्यानंतर पोलिस चोराच्या मागावर होते. याच दरम्यान संशयिताला माडेल थिवीतून ताब्यात घेण्यात आलंय.

हेही वाचाः CORONA UPDATE | कोविड पॉझिटिव्हीटी दर घटला

असा सापडला चोर

पर्वरीतून चोरी केलेली दुचाकी घेऊन संशयित फिरत होता. या दुचाकीला नंबर प्लेट नसल्यानं पोलिसांनी संशयिताला अडवलं आणि त्याची चौकशी केली. चौकशी अंती दुचाकी चोरीची असल्याची गोष्ट समोर आली. अशाप्रकारे हा दुचाकी चोर पोलिसांच्या तावडीत सापडला.

हेही वाचाः पेडणे पोलिसांकडून चोरी प्रकरणी एकास अटक

या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे, असं म्हापसा पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!