म्हापसा पालिकेने घेतला ‘हा’ निर्णय…

Goan Varta Live | प्रतिनिधी
म्हापसा : येथील पालिका कर्मचारीवर्गाचा वैद्यकीय भत्ता वाढविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बुधवारी संयुक्त बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. म्हापसा पालिका कर्मचारी संघटनेने पालिका मंडळाकडे मागणीपत्र (चार्टर ऑफ डिमांड) सादर केले आहे. २३ जून रोजी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांनी हा विषय चर्चेसाठी ठेवला होता.
हेही वाचा:‘स्थानिक रोजगार विधेयक’ विधानसभा कामकाजात दाखल
१९ कलमी मागणीपत्रावर सविस्तर चर्चा करण्यात आली
संघटनेसोबत प्रथम बैठक घ्यावी व नंतर हा प्रस्ताव पालिका मंडळाच्या बैठकीत ठेवावा, ही सूचना मान्य करण्यात आली होती. त्यानुसार नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी सीताराम सावळ, अखिल गोवा पालिका कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष गोविंद मांद्रेकर, म्हापसा पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कांबळे व पदाधिकारी तसेच काही नगरसेवक उपस्थित होते. कर्मचारी संघटनेने ठेवलेल्या १९ कलमी मागणीपत्रावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कर्मचार्यांचा वैद्यकीय भत्ता व ध्वजारोहण भत्ता वाढविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. शिवाय इतर मागण्यांच्या बाबतीत पालिकेची आर्थिक स्थिती पाहून सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन कर्मचारी संघटनेला देण्यात आले.
हेही वाचा:२४ तासांत आणखी २०१ करोनाबाधित…
पालिकेच्या बैठकीत शिक्कामोर्तब
म्हापसा पालिका कर्मचारी संघटनेच्या मागणी पत्राबाबत पालिकेने संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत वैद्यकिय भत्ता व ध्वजारोहण भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी पालिका मंडळाच्या बैठकीत यावर चर्चेनंतर शिक्कामोर्तब करण्यात येईल, अशी हमी नगराध्यक्षांनी दिली आहे, अशी माहिती अखिल गोवा नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांनी दिली.
हेही वाचा:राज्यात मुसळधार पाऊस कायम राहणार…