अपघाताची भीती! म्हापसा कोर्ट जंक्शनवर बंद पडलेल्या सिग्नलमुळे वाहतूक कोंडी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
म्हापसा : सर्वात व्यस्त जंक्शनपैकी म्हापसा कोर्ट जंक्शन हे प्रमुख जंक्शन आहे. या जंक्शनवरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उभारलेले ट्रॅफिक सिग्नल काही दिवसांपासून बंद पडलेत. त्यामुळे जंक्शन अपघातास कारणीभूत ठरून वाहतूक विस्कळीत होण्यासह वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. तसंच सिग्नल बंद असल्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकरच सिग्नल सुरु व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
ट्रॅफिक पोलिसांची कसरत
गेल्या आठवड्याभरापासून कोर्ट जंक्शनवरील ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन ती जळाली. त्यामुळे हे सिग्नल्स बंद पडलेत. त्यामुळे वाहनधारक आणि पादचारी लोकांची धांदळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सिग्नल्स अभावी जंक्शनवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागतेय.
दुरुस्ती कुठवर आली?
शहरातील मुख्य अशा या जंक्शनवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पालिका मंडळाने वाहतूक पोलिस विभागाच्या सहाय्याने जंक्शनवर चारही बाजूने ट्रॅफिक सिग्नल उभारले होते. सिग्नलच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने ते बंद पडल्यामुळे जंक्शनवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिग्नलचे काही पार्ट्स जळाले आहेत आणि ते बदलण्याची गरज आहे. यासंदर्भात शनिवारी सिग्नल्स देखभाल एजन्सीला कळवण्यात आलंय. सोमवारी एजन्सीतर्फे बंद पडलेल्या सिग्नलची पाहणीही करण्यात आली आहे.
नगराध्यक्ष रायन ब्रांगांझा म्हणतात, की..
बंद पडलेल्या सिग्नल्स बाबत आपण एजन्सीकडे चर्चा केली आहे. त्यांनी सिग्नलची तपासणी केली आहे. सिग्नलचे काही भाग खराब झाले असून येत्या दोन दिवसांत एजन्सीतर्फेदुरूस्ती काम हाती घेण्यात येईल.
नगराध्यक्ष रायन ब्रागांझा
हेही वाचा –
पत्ता विचारायला आले आणि सोन्याची चैन पळवून गेले
1ली ते 8वीच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात