पत्ता विचारायला आले आणि सोन्याची चैन पळवून गेले

Goan Varta Live | प्रतिनिधी
म्हापसा : चोरीच्या दररोज वेगवेगळ्या घटना राज्यात उघडकीस येत असतात. अशातच आता म्हाशातून एक आणखीनच विचित्र घटना समोर आली आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चैन चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकी घटना काय घडली?
माधुररी वेर्लेकर या मॉर्निंक वॉक करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींना त्यांना पत्ता विचारला. पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं पासष्ट वर्षीय महिलेला हिसका मारुन त्यांनी या महिलेच्या गळ्याच चैनीवर हात साफ केलेत. खोर्ली-म्हापसामध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्राही दाखल करण्यात आली आहे. यावेळी एकानं हेल्मेट घातलं असल्याचीही माहिती देण्यात येतेय.
सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट
या चोरीमध्ये चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने १ लाख रुपयांच्या सोनसाखळीवर हात साफ केलेत. दुचाकीवरुन येऊन त्यांनी ही चोरी केली आहे. याप्रकरणी पोलिसात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पत्ता सांगायचा की नाही?
या घटनेमुळे आता पत्ता विचारला आलेल्यांकडे लोकं संशयाने बघणार हे नक्की. जराही शंका आली तर शक्यतो अशा घटना होण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. त्यामुळे सतर्क राहा. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
हेही वाचा –
अजबच! ती चक्क दातांनी सोलते नारळ…
थोडक्यात अनर्थ टळला! झाडाची फांदी पडून कारचं मोठं नुकसान