सिंधुदुर्गात ‘म्हाडा’ उभारणार 50 बेडचं अद्ययावत कोविड रुग्णालय

भविष्यात रूग्णसंख्या वाढल्यास १०० बेडही इथं उपलब्ध करून दिले जाणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून कोकणवासियांच्या मदतीला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड धावलेत. त्यांच्या माध्यमातून म्हाडा अंतर्गत ५० बेडच अद्ययावत रुग्णालय उभे करण्यात येत आहे. अद्ययावत व्हेंटीलेटर, ऑक्सिजन बेडच हे रूग्णालय जिल्हा रुग्णालयाशेजारी उभारण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाले.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तर भविष्यात रूग्णसंख्या वाढल्यास १०० बेड इथं उपलब्ध करून दिले जाणार आहे. या रुग्णालयासाठी लागणारा स्टाफ, डॉक्टर यांच्या बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचाशी चर्चा झाली असून त्यांनी ही पुर्तता करण्याचं आश्वासन दिलं अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर, अनंत पिळणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अशोक पवार, शफिक खान आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!