मगोपला फोंड्यात धक्का, हा युवा नगरसेवक भाजपात

उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याच्या प्रयत्नात भाजप.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

फोंडा : फोंडा नगरपालिकेचे राजकारण दिवसेंदिवस रंगतदार होताना दिसत आहे. पालिकेतील मगोपचे आणखी एक युवा नगरसेवक वीर ढवळीकर पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपल्या शंभरेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करत आहेत. वीर ढवळीकर यांचा शुक्रवारी संध्याकाळी भाजपात रीतसर प्रवेश होणार आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षातील काही ज्येष्ठ नगरसेवकांच्या दगाबाजीमुळे बहुमत असूनही भाजपला हार पत्करावी लागली होती. या निवडणुकीत मगोपच्या अमिना नाईक विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीनंतर मगोपचे नगरसेवक बाबू सावकार यांनी लगेच भाजपात प्रवेश केला होता. आता मगोपचे दुसरे युवा नगरसेवक वीर ढवळीकर यांचा भाजपात पक्षप्रवेश होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सध्याच्या उपनगराध्यक्ष अमिना नाईक यांच्यावर अविश्वास ठराव आणून वीर ढवळीकरांना नवे उपनगराध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!